मुंबई: मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे, तर दुसरीकडे पंजाब किंग्सला विजयाची सवयच झाली आहे असे दिसते. आयपीएल 2026 च्या 24 व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला एकतर्फी 7 गडी राखून पराभूत केले. 195 धावांचा डोंगर उभा करूनही मुंबईला सामना गमवावा लागला. मुंबईकडून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने 60 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या, पण त्याचे शतक व्यर्थ ठरले. आता पराभवानंतर कर्णधार Hardik Pandya काय म्हणाला पाहा.
हार्दिक पांड्या म्हणतो की, “आम्हाला आमच्या रणनीतीवर पुनर्विचार करण्याची आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूमध्ये किंवा संपूर्ण संघात काही कमतरता आहेत का, हे ठरवण्याची गरज आहे. त्याच्या मते, दुसऱ्या डावात ड्यू पडले होते आणि पहिल्या डावाच्या अखेरीस चेंडूला रिव्हर्स स्विंग मिळाला होता, परंतु खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्यापेक्षा वरचढ ठरल्याबद्दल विरोधी संघ कौतुकास पात्र आहे. आम्हाला काही कठीण निर्णय घेता येतात का किंवा परिस्थिती बदलता येते का, हे पाहण्याची गरज आहे; पण आता प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्याला वाटते.”
