मुंबई प्रतिनिधी
गोर गरीब , तरुण,शाळेय मुले यांना मोवाईल अँपद्वारे ऑनलाईन लॉटरी जुगार मुंबईसह महाराष्ट्रात संघटीत रित्या भांडूप परिसरातून मंगल पुरोहित व महेश पुरोहित तसेच दहिसर परिसरातून देवी पटेल माउंटन व सिल्वर कॉइन या नावे सॉफ्टवेअर चा वापर करून मोबाईल अँपद्वारा अन्नू,अज्जू,नाना ठाकुर या प्रमुख एजेंटा बरोबर इतर गल्ती बोलातील एजन्टा मार्फत संघटित रित्या जुगार खेळवीत आहेत.
महराष्ट्रातजुगार प्रतिबंध कायदा १९९८ चा मुंबई अधिनियम हा राज्यातील सर्व बेकायदेशीर जुगाराला आला घालणारा प्रमुख कायदा आहे व एमपीडीए(MPDA) कायद्याचा भंग करून संघटितरित्या शासनाला,पोलीसांना न जुमानता जुगार खेळवीत आहेत. व गुन्हेगारी वाढविण्यास हातभार लावीत आहेत.
या संघटीत गुन्हेगारीमुळे तरुण पीढी व्यवसनाधीन होत आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत तर हे परप्रांतीय पैशाने गब्बर होत आहेत. तर संपूर्ण पैसा हा परराज्यात पाठवत आहेत. तरुणांची गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पोलीस यंत्रणे कडून या अवैध धंदयाकडे जाणीव पूर्वक दुर्लश केले जाते यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.
समाजाच्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीच्या संरक्षणासाठी या अवैध धंद्याच्या मुळात जाऊन एमपीडीए(MPDA)अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी लहान मुलांच्या पालकांकडून तसेच समाजाकडुन होत आहे.





