मुंबई, प्रतिनिधी : ब्रेन स्टेम मृत घोषित करण्यात आलेल्या अवयवदात्या महिलेची अवयवदान प्रक्रिया आणि अपघाती प्रकरणात आवश्यक असलेले वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन एकाच रुग्णालयात यशस्वीपणे पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाने केली. जे. जे. रुग्णालयाच्या न्यायवैद्यक पथकाने खासगी रुग्णालयात जाऊन अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ३९ वर्षीय महिलेला दुचाकीवरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दीर्घकाळ उपचार केल्यानंतर २६ जून २०२६ रोजी तिला नियमानुसार ब्रेन स्टेम मृत घोषित करण्यात आले. अत्यंत दुःखद परिस्थितीतही तिच्या कुटुंबीयांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानास संमती दिली. त्यानंतर मानवी अवयव व ऊती प्रत्यारोपण कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. हे अपघाताशी संबंधित वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण असल्यामुळे शवविच्छेदन करणे आवश्यक होते. सर्वसाधारणपणे अवयव काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संबंधित शासकीय रुग्णालयात पाठवावा लागतो. त्यामुळे मृतदेहाच्या वाहतुकीत वेळ जातो आणि आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांची प्रतीक्षा आणखी वाढते. ही अडचण टाळण्यासाठी डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याची लेखी विनंती तसेच जे. जे. रुग्णालय, रिलायन्स रुग्णालय, मुंबई पोलीस आणि झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्या समन्वयातून जे. जे.चे न्यायवैद्यक पथक थेट रिलायन्स रुग्णालयात पोहोचले. न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. जी. चिखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एन. पानशेवडीकर यांच्या नेतृत्वात डॉ. एम. एम. तिडके आणि डॉ. आर. टी. भानारकर यांच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. अवयव पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेदरम्यान न्यायवैद्यक तज्ज्ञ उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्याच रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले. अवयव पुनर्प्राप्तीची प्रक्रिया २६ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू झाली. महिलेचे हृदय, दोन्ही फुफ्फुसे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी काढण्यात आली. दोन्ही कॉर्नियांचेही दान करण्यात आले. शवविच्छेदन रात्री १०.३० वाजता सुरू होऊन मध्यरात्री १२.३० वाजता पूर्ण झाले. अवयव काढताना करण्यात आलेल्या शस्त्रक्रियात्मक बदलांसह उपचार आणि दुखापतींशी संबंधित प्रत्येक निष्कर्षाची स्वतंत्र, सविस्तर आणि शास्त्रीय नोंद करण्यात आली. या समन्वयामुळे अवयवदानाच्या जीवनरक्षक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ देण्यात आला नाही. त्याचवेळी वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रियाही काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली. मृतदेह दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची आवश्यकता टळल्यामुळे कुटुंबीयांची प्रतीक्षा कमी झाली आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक संवेदनशील व सन्मानपूर्वक पूर्ण करता आली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबईने २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित २६व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविले. विभागाच्या वतीने डॉ. एच. एन. पानशेवडीकर यांनी हा सन्मान स्वीकारला. शासकीय आणि खासगी आरोग्यसंस्था, न्यायवैद्यक तज्ज्ञ, पोलीस आणि अवयव प्रत्यारोपण यंत्रणा यांच्या अचूक समन्वयाचे हे उदाहरण भविष्यात राज्यस्तरीय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. छायाचित्र ओळ : झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबईकडून न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाला प्रदान करण्यात आलेल्या सन्मानचिन्हासह सहयोगी प्राध्यापक डॉ. एच. एन. पानशेवडीकर.
औताला बैलाऐवजी पत्नीचा खांदा – आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला न्याय
अशोक भेके रिपरिप पडणाऱ्या पावसाने अचानक जोर धरला. विजांचा गडगडाट सुरू झाला. काशिनाथ आणि हौसाबाई घराच्या दारात उभे राहून पावसाचे ते अक्राळविक्राळ रूप पाहत होते. तितक्यात कानठळ्या बसवणारा एक मोठा आवाज झाला. कानात दडे बसल्यासारखे काही क्षण काहीच ऐकू येईना. भयभीत नजरेने काशिनाथने गोठ्याकडे पाहिले आणि त्याची नजर तिथेच खिळली. गोठ्यात बांधलेले सर्जा आणि राजा… त्यापैकी राजा वीज कोसळून धारातीर्थी पडला होता. काशिनाथने धावत जाऊन “राजा… अरे राजा!” अशी हाक मारली. पण राजा निपचित पडला होता. त्याच्यात काहीच हालचाल नव्हती. शेजारी उभा असलेला सर्जा राजाकडे रोखून पाहत होता. त्या मुक्या जनावरालाही सारं काही कळलं होतं. आपला सोबती आपल्याला सोडून गेल्याच्या दुःखाने त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची बरसात सुरू झाली. काशिनाथच्या पाठोपाठ हौसाबाई धावत आली आणि ते दृश्य पाहून तिने धाय मोकलून रडायला सुरुवात केली. शेतीसाठी दोन बैलांवरच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजाच्या घरावर जणू आभाळच कोसळले होते. मुळातच गरिबीची परिस्थिती आणि त्यात शेतीचा उजवा हात असलेला राजाच निखळून पडला होता. हा हा म्हणता ही बातमी गावभर पसरली. मुसळधार पाऊस असूनही निपचित पडलेल्या राजाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. “वाईट झालं… आता काशिनाथचं कसं होणार?” ही दबक्या आवाजातली चिंता काशिनाथ आणि हौसाबाईच्या कानावर पडायला वेळ लागला नाही. नवा बैल विकत घ्यायला पैसे नव्हते, पण शेती केल्याशिवाय पर्यायही नव्हता. अखेर काळजावर दगड ठेवून काशिनाथने एका बाजूला सर्जाला नांगराला जुंपले आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पत्नीने, हौसाबाईने खांदा दिला. ती मुकाट्याने नांगर ओढू लागली. गावातील काही मुलांनी हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावातील शेतकरी काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांचा हा संघर्षमय व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला की तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला. व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री हळहळले. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला आदेश दिला की, काशिनाथ आणि हौसाबाई यांना त्वरित एक बैल द्यावा. आदेशानंतर संबंधित विभाग कामाला लागला आणि त्यांनी सरकारी कामाचा एक वेगळाच नमुना दाखवला. त्यांनी काशिनाथला एका गोशाळेतून आणलेला एक आजारी, अशक्त बैल सुपूर्द केला. बिचाऱ्या काशिनाथने आहे त्या परिस्थितीतच समाधान मानले आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण दुर्दैव काही त्याची पाठ सोडेना. जेव्हा नव्या बैलाला सर्जासोबत नांगराला जुंपले, तेव्हा काही क्षणातच तो अशक्त बैल कोसळला. पडताना त्याने सर्जालाही खाली पाडले, त्यामुळे सर्जा देखील जखमी झाला. या नव्या बैलाची कहाणी गावकऱ्यांना समजताच मुलांनी पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही बातमी पुन्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. आपल्याच प्रशासनाने एका गरीब शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे पाहून त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. त्यांनी पुन्हा एकदा संबंधित विभागाला कठोर आदेश दिला – यावेळी काशिनाथला त्याच्या पसंतीचा बैल रोख रक्कम देऊन बाजारातून विकत घेऊन द्यावा. यावेळी अधिकारी खडबडून जागे झाले. अखेर काशिनाथला त्याच्या मनासारखा धष्टपुष्ट बैल मिळाला. एका गरीब शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. शासन आणि सत्ताधारी मनापासून काम करत असतात, पण झारीतील शुक्राचार्य त्यांच्या चांगल्या कामात अडथळे कसे निर्माण करतात, हेच या घटनेतून खेदाने दिसून येते.
फेरबंदर येथे दहीहंडी सराव शिबिर
मुंबई प्रतिनिधी
केतन खेडेकर शिवसेना भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक 208 यांच्या वतीने गुरुवार दि. 27 ऑगस्ट, 2026 सायं. ६ ते रात्रौ, १० वा. पर्यंत स्थळ : न्यू हिंद मिल म्हाडा संकुल समोर, फेरबंदर,मुंबई- 400033 येथे दहीहंडी सराव शिबिराचेआयोजन करण्यात आलेले आहे. हा फक्त दहीहंडी उत्सव नसून “मराठमोळ्या संस्कृतीचा जागतिक किर्तीमान” आहे. आपली संस्कृती आपणास जोपासली पाहिजे या हेतूने आम्ही या दही आणि सराव शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात सर्व गोविंदा पथकांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.तरी या सोहळ्यास आपण उपस्थित राहून, आम्हां सर्व मराठी जनांचा आणि सर्व गोविंदा पथकांचा आनंद, उत्साह द्विगुणित करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भायखळा विधानसभा उपविभागप्रमुख आयोजक परेश कुवेसकर यांनी केले आहे.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलकडून १७५ हून अधिक एपिलेप्सी शस्त्रक्रिया पूर्ण
मुंबई प्रतिनिधी क्यूरेटिव्ह शस्त्रक्रियेनंतर किमान एक वर्षाच्या फॉलो-अपमध्ये ८७ टक्के मुलांना आकडी येणे बंद झाले; मुलांमधील गुंतागुंतीच्या औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीसाठी बहुविद्याशाखीय काळजी आणि वैयक्तिक शस्त्रक्रिया पद्धती मुंबई, ऑगस्ट २५, २०२६: नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने मुलांमधील औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सीवरील (आकडी येणे) भारतातील एकमेव आणि देशातील सर्वात मोठ्या समर्पित उपक्रमाद्वारे १७५ हून अधिक एपिलेप्सी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या 200 च्या ट्रॅकवर पूर्ण केल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये क्युरेटिव्ह एपिलेप्सी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपैकी किमान एक वर्षाच्या फॉलो-अपनंतर ८७ टक्के मुलांना आकडी येणे बंद झाले आहे. भारतातील उपचारांच्या मोठ्या गरजेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. भारतातील बाल आणि किशोरावस्थेतील लोकसंख्येपैकी अंदाजे ०.८ टक्के व्यक्तींना एपिलेप्सी आजार आहे. एपिलेप्सीने ग्रस्त असलेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये ही स्थिती बालपणातच विकसित होते. एपिलेप्सीग्रस्त मुलांपैकी सुमारे एक तृतीयांश मुलांना ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सी (औषधांना प्रतिसाद न देणारे एपिलेप्सी) असल्याचे स्पष्ट होते, ज्यांच्यासाठी विशेष औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या एपिलेप्सी केंद्रात वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात जवळपास २ ते ३ दशलक्ष व्यक्ती ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सीसह जगत आहेत, ज्यांपैकी सुमारे एक दशलक्ष व्यक्ती एपिलेप्सी शस्त्रक्रियेसाठी पात्र असू शकतात. तरीही, सध्या पात्र असलेल्या दर १,००० रुग्णांपैकी केवळ २ रुग्णांवर शस्त्रक्रिया होते, जी उपचारांमधील असलेली मोठी दरी दर्शवते. नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील एपिलेप्सी उपक्रम भारतातील चतुर्थ श्रेणीतील बालरोग न्यूरॉलॉजी उप-विशेषज्ञांचा विस्तार करण्याच्या ध्येयाने न्यूरोसायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ. अनायता उदवाडिया हेगडे, पीडियाट्रिक न्यूरॉलॉजीच्या सीनियर कंसल्टण्ट डॉ. प्रज्ञा गाडगीळ आणि सीनियर कंसल्टण्ट पीडियाट्रिक न्यूरोसर्जन डॉ. सौरव सामंतराय या डॉक्टरांच्या समर्पित टीमद्वारे सुरू करण्यात आला होता. नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागाच्या प्रमुख डॉ. अनायता उदवाडिया हेगडे म्हणाल्या, “भारतात सर्वसमावेशक तृतीयक बालरोग न्यूरोसायन्स सेवांची गरज यापूर्वी कधीही नव्हती इतकी वाढली आहे. लहान मुलांमधील न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये एपिलेप्सी हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे, तरीही विशेष उपचारांची उपलब्धता मर्यादित आहे. समर्पित टीम आणि पायाभूत सुविधांच्या पाठिंब्याशिवाय गुंतागुंतीचे न्यूरॉलॉजी उपचार प्रभावीपणे दिले जाऊ शकत नाहीत. यासाठी प्रबळ संस्थात्मक उपक्रमांची गरज असते, जिथे बहुविद्याशाखीय टीम्स विशेष पायाभूत सुविधा आणि प्रोटोकॉल-आधारित व्यवस्थापनाच्या कार्यसंस्कृतीच्या आधारे एकत्र काम करतात.” नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्स पेडियाट्रिक एपिलेप्सी प्रोग्रामच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा गाडगीळ म्हणाल्या, “अनियंत्रित बालरोग एपिलेप्सी ही अतिशय कठीण परिस्थिती असते. वारंवार आणि अचानक येणाऱ्या आकडीव्यतिरिक्त यामुळे जीवन आणि शरीराला मोठा धोका निर्माण होतो. सततचा अनियंत्रित एपिलेप्सी आणि आकडी येणे कमी करण्यासाठी दिली जाणारी अनेक औषधे यांमुळे मज्जासंस्थेच्या विकासावरही मोठा परिणाम होतो. अशा मुलांवर बऱ्याचदा शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य असतात, जिथे शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे आकडी-मुक्त होण्याची शक्यता असते. अचूक प्री-सर्जिकल मूल्यमापनाद्वारे अशा मुलांची वेळेवर ओळख पटवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतर मुलांना डिसीज-मॉडिफायिंग एपिलेप्सी शस्त्रक्रियांचा फायदा होऊ शकतो.” नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे पीडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे सीनियर कंसल्टण्ट डॉ. सौरव सामंतराय म्हणाले, “एपिलेप्सी शस्त्रक्रिया म्हणजे अत्यंत विशिष्ट न्यूरोसर्जिकल प्रक्रियांचा समूह आहे, ज्या प्रत्येक मुलासाठी वैयक्तिकरित्या निवडल्या जातात. काही प्रक्रियांचा उद्देश आकडी येण्यासाठी कारणीभूत असलेल्या उती काढून टाकणे, त्यांचा संपर्क तोडणे किंवा मिनिमली इनव्हेसिव्ह पद्धतीने त्या काढून आकडी बंद करणे हा असतो, तर इतरांचा उद्देश पूर्ण उपचार अशक्य असल्यास आकडीची गंभीर तीव्रता कमी करणे हा असतो. योग्यरित्या निवडलेल्या मुलांमध्ये याचे फायदे केवळ आकडी नियंत्रणात आणण्यापुरते मर्यादित राहत नाहीत. एपिलेप्सी पूर्ण बरा होतो किंवा चांगल्या प्रकारे नियंत्रणात येतो, तेव्हा बऱ्याचदा न्यूरोकॉग्निटिव्ह कार्यक्षमतेत सुधारणा होते. त्यामुळे एपिलेप्सी शस्त्रक्रियेचे फायदे केवळ आकडी नियंत्रणात आणण्यापलीकडे जातात. हे परिणाम केवळ एका वैयक्तिक न्यूरोसर्जनद्वारे नाही, तर अनुभवी बहुविद्याशाखीय एपिलेप्सी टीमद्वारे साध्य केले जाऊ शकतात.” या उपक्रमातील खालील केसेस वेळेवर केलेल्या शस्त्रक्रिया मूल्यांकन आणि उपचारांमुळे काय साध्य होऊ शकते हे स्पष्ट करतात: रोहन (नाव बदलले आहे) या सहा वर्षांच्या मुलाला दोन वर्षांचा असताना दररोज ड्रॉप अटॅक्स (अचानक चक्कर येऊन पडणे) येऊ लागले होते. पुढील दोन ते तीन वर्षांत त्याची वाचण्याची, लिहिण्याची आणि इतर मुलांशी संवाद साधण्याची क्षमता कमी झाली. अनेक औषधे देऊनही त्याचे ड्रॉप अटॅक्स नियंत्रणात न आल्यामुळे त्याच्यावर कॉर्पस कॅलोसोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी त्याचे ड्रॉप अटॅक्स पूर्णपणे थांबले. पुढील काही महिन्यांत, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या मदतीने त्याने पुन्हा कविता म्हणणे आणि अक्षरे व अंक लिहिणे सुरू केले. प्रतीक (नाव बदलले आहे), जो आता विशीत आहे, वयाच्या साडेतीन वर्षांपासून रात्रीच्या वेळी येणाऱ्या तीव्र आकडीचा सामना करत होता. विविध केंद्रांमध्ये तपासण्या करूनही तब्बल २३ वर्षे या त्रासामुळे तो आणि त्याचे कुटुंब रात्रभर जागे राहत असे. एसआरसीसीमधील नवीन मूल्यांकनात त्याच्या मज्जासंस्थेतील जन्मतः असलेला दोष समोर आला, जो दोन दशकांहून अधिक काळ इतरत्र लक्षात आला नव्हता. हा दोष काढून टाकण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पहिल्याच रात्रीपासून त्याला एकही आकडी आली नाही. जवळपास सहा महिने उलटूनही त्याला आकडी आलेली नाही आणि पुन्हा सामान्य जीवन जगत आहे. रत्नागिरीतील १० वर्षांची मुलगी मिथिला (नाव बदलले आहे) हिला जन्मापूर्वी झालेल्या मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे बालपणापासून रोज आकडी येत होती. इतर केंद्रांनी तिच्यावर फारसे काही उपचार होऊ शकत नाहीत असे सांगितले होते. विद्यमान उजव्या बाजूच्या अशक्तपणाची समस्या अधिक वाढण्याचा धोका असतानाही तिच्यावर हेमिस्फेरेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्याद्वारे मेंदूचा दुखापत झालेला अर्धा भाग सुदृढ भागापासून वेगळा करण्यात आला. तीन महिन्यांनंतर तिला आकडी येणे बंद झाले आहे आणि पुनर्वसनाच्या मदतीने स्वतःच्या पायावर चालत आहे व आयुष्यात पहिल्यांदाच बोलू लागली आहे. राज (नाव बदलले आहे), वय १२ वर्षे, याला जन्माच्या वेळी मेंदूला दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याच्या शारीरिक व मानसिक विकासावर याचा परिणाम झाला नाही, वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत तो अगदी फुटबॉलही खेळत होता. पण, वाढत जाणारे झटके आणि ईईजीच्या ढासळण्यामुळे तो अंथरुणाला खिळला आणि त्याची बोलण्याची क्षमताही गेली. उपचाराच्या पर्यायांबद्दल पुरेशी जागरूकता नसल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया तब्बल एक वर्ष लांबणीवर पडली. कॉर्पस कॅलोसोटोमी शस्त्रक्रियेनंतर त्याचे ड्रॉप अटॅक्स पूर्णपणे थांबले. सहा महिन्यांनंतर तो स्वतःच्या पायावर चालत आहे आणि बोलू लागला आहे. सोनम (नाव बदलले आहे), ही साडेपाच वर्षांची मुलगी दुर्मिळ हायपोथॅलॅमिक हॅमार्टोमामुळे दररोज ‘हसण्याचे झटके’ सहन करत होती. हा मेंदूच्या अतिशय खोल भागात असलेला दोष असल्याने पारंपारिक ओपन न्यूरोसर्जिकल पद्धतीने तिथे पोहोचल्यास गंभीर गुंतागुंत होण्याचा मोठा धोका होता. तिच्यावर स्टिरिओटॅक्टिक रेडिओफ्रीक्वन्सी अब्लेशन ही मिनिमली इनव्हेसिव्ह (किमान शस्त्रक्रिया असणारी) प्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच ती कोणतीही गुंतागुंत न होता पूर्ण शुद्धीवर आली आणि अन्न सेवन करू लागली. तिचे झटके पूर्णपणे थांबले आहेत. साडेतीन वर्षांत १७५ हून अधिक पीडियाट्रिक एपिलेप्सी शस्त्रक्रियांचा अनुभव एका सोप्या संदेशाला दुजोरा देतो: औषधे देऊनही मुलाला सतत आकडी येत असेल, तर एपिलेप्सी हा आजार लपवून न ठेवता त्यावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. भारतातील फार कमी केंद्रांमध्ये मुलांमधील ड्रग-रेजिस्टंट एपिलेप्सीवर उपचार केले जातात. अशा अत्यंत विशिष्ट क्षेत्रात या उपक्रमातील यश हे गुंतागुंतीच्या केसेसमधील मोठ्या अनुभवाचे प्रतीक आहे. वेळेवर घेतलेली दखल, योग्य केंद्राकडे केलेले संदर्भ आणि विशेष उपचारांची उपलब्धता यामुळे वर्षानुवर्षे अनियंत्रित राहणारी आकडी रोखून मुलाला पुन्हा शिक्षण, विकास आणि सामान्य आयुष्याकडे
अदानी इलेक्ट्रिसिटीने साडेचारशे कामगारांना कामावरून काढले
मुंबई प्रतिनिधी – अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, – टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे घाणेरडे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप ‘अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशन’ने केला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून या अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखवण्याची तयारीकंपनीकडून सुरू असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जात असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी आक्रमक झाले आहेत. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी आज मुंबईतील आझाद मैदान येथे कुटुंबासहित लाक्षणिक धरणे आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढची खाली करा, नोकरी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, आमचा अधिकार आमचा हक्क अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. व्यवस्थापनाने कोणालाही कामावरून काढू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी बोरकर, सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी दिली.
अदानी इलेक्ट्रिसिटीने साडेचारशे कामगारांना दाखवला घरचा रस्ता.
मुंबई प्रतिनिधी – अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, – टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे घाणेरडे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप ‘अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशन’ने केला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून या अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखवण्याची तयारीकंपनीकडून सुरू असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जात असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी आक्रमक झाले आहेत. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी आज मुंबईतील आझाद मैदान येथे कुटुंबासहित लाक्षणिक धरणे आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढची खाली करा, नोकरी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, आमचा अधिकार आमचा हक्क अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. व्यवस्थापनाने कोणालाही कामावरून काढू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी बोरकर, सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी दिली.
देहविक्रि करणाऱ्या भगिनीसोबत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करणार रक्षाबंधन
केतन खेडेकर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रक्षाबंधनाचे औचित्य साधून समाजातील दुर्लक्षित असलेला देहव्यापार करणा-या भगिणींसाठी शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कामाठीपुरा ११ वी गल्ली, आर. एस. निमकर मार्ग, नागपाडा, मुंबई रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमात आठवले हे स्वतः या भगिणींकडून राखी बांधून घेऊन त्यांच्याशी आपुलकीचे आणि बंधुत्वाचे नाते जपणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये भगिणींसाठी साडीवाटप आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. तसेच विभागातील नागरिकांसाठी आणि देहविक्रीय करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबीर देखील आयोजीत केले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पवार आणि मुंबादेवी तालुका अध्यक्ष युवानेता विशालभाई दिवार यांनी केले आहे.
MCX कडून क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स करार सादर
नवीन करारामुळे भारतातील मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या खाद्यतेल बाजारपेठेत किंमत निर्धारण आणि जोखीम व्यवस्थापन अधिक सक्षम होणार
मुंबई, 13 ऑगस्ट 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) ने आज क्रूड सनफ्लॉवर ऑइलवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सुरू करण्याची घोषणा केली. या माध्यमातून भारतातील खाद्यतेलाच्या संपूर्ण मूल्यसाखळीतील सहभागींसाठी एक्सचेंजवर उपलब्ध जोखीम व्यवस्थापनाच्या पर्यायांचा विस्तार करण्यात आला आहे.भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 26–27 दशलक्ष टन खाद्यतेलाचा वापर होतो आणि त्यापैकी 60% पेक्षा अधिक गरज आयातीद्वारे भागवली जाते. आयातीवरील या मोठ्या प्रमाणातील अवलंबित्वामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर जागतिक किमतीतील चढ-उतार, आंतरराष्ट्रीय मागणी-पुरवठ्याची स्थिती, चलनातील चढ-उतार तसेच स्पर्धात्मक खाद्यतेलांच्या किमतींमधील बदलांचा मोठा परिणाम होतो. भारताच्या एकूण खाद्यतेलाच्या वापरामध्ये सनफ्लॉवर ऑइलचा वाटा सुमारे 9% आहे. दरवर्षी क्रूड सनफ्लॉवर ऑइलचा वापर अंदाजे 3.0 दशलक्ष टन इतका आहे. यापैकी जवळपास 2.8 दशलक्ष टन गरज आयातीद्वारे भागवली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीतील बदल आणि जागतिक पुरवठ्याच्या परिस्थितीचा या बाजारपेठेवर विशेष प्रभाव पडतो.त्यावर पर्यायी तेलांच्या वापराच्या पद्धती आणि सनफ्लॉवर ऑइलची तुलनात्मक स्पर्धात्मकता यातून खाद्यतेलांच्या किमती एकमेकांशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत. त्यामुळे परस्पर अधिकाधिक जोडल्या जाणाऱ्या खाद्यतेल बाजारपेठेत बाजारातील सहभागींसाठी किमतीतील जोखमीचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.हा करार सादर करण्याबाबत बोलताना MCX च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री प्रवीणा राय म्हणाल्या, “क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सादर केल्यामुळे बाजारातील सहभागींना किमतीतील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने एक्सचेंजवर व्यवहार करता येणारी यंत्रणा उपलब्ध होईल. त्याचबरोबर देशांतर्गत खाद्यतेल बाजारपेठेच्या विकासालाही यामुळे अधिक बळकटी मिळेल.” नवीन कराराची रचना आयातदार, रिफायनर्स, प्रक्रिया उद्योग, व्यापारी तसेच मूल्यसाखळीतील इतर सहभागींसाठी करण्यात आली आहे. किमतीतील अस्थिरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तसेच त्यांच्या जोखीम व्यवस्थापनाच्या धोरणांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा एक्सचेंजवर व्यवहार करता येणारा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा करार कॅश-सेटल्ड असेल. यामध्ये लागू विक्रीकर/GST वगळून Ex-Tank JNPT या आधारावर किमती निर्देशित केल्या जातील.क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टच्या सादरीकरणामुळे MCX ची पारदर्शक आणि कार्यक्षम कमोडिटी बाजारपेठांना चालना देण्याची भूमिका आणखी मजबूत होईल. तसेच, मूल्यसाखळीतील सहभागींसाठी कमोडिटीच्या किमतीतील जोखीम अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.
पालकमंत्री पदाच्या संधीचे नक्कीच सोने करणार, पालकमंत्री भरतशेठ गोगावले
मुंबई प्रतिनिधी आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो. रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेने मला प्रेम दिले, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. आज महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन. आजपर्यंत महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील जनतेने आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या शिवसैनिकांनी मला जी साथ दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आता हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जायचे आहे. माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे. पदाबरोबर जबाबदारी येते आणि जबाबदारीसोबत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळते. आज रायगडच्या विकासाची ही संधी मला मिळाली आहे. या संधीचे नक्कीच सोन करेन.अशी माहिती अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री आणि नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली.
MCX कडून क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स करार सादर
नवीन करारामुळे भारतातील मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या खाद्यतेल बाजारपेठेत किंमत निर्धारण आणि जोखीम व्यवस्थापन अधिक सक्षम होणार
मुंबई, 13 ऑगस्ट 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX) ने आज क्रूड सनफ्लॉवर ऑइलवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सुरू करण्याची घोषणा केली. या माध्यमातून भारतातील खाद्यतेलाच्या संपूर्ण मूल्यसाखळीतील सहभागींसाठी एक्सचेंजवर उपलब्ध जोखीम व्यवस्थापनाच्या पर्यायांचा विस्तार करण्यात आला आहे.भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 26–27 दशलक्ष टन खाद्यतेलाचा वापर होतो आणि त्यापैकी 60% पेक्षा अधिक गरज आयातीद्वारे भागवली जाते. आयातीवरील या मोठ्या प्रमाणातील अवलंबित्वामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर जागतिक किमतीतील चढ-उतार, आंतरराष्ट्रीय मागणी-पुरवठ्याची स्थिती, चलनातील चढ-उतार तसेच स्पर्धात्मक खाद्यतेलांच्या किमतींमधील बदलांचा मोठा परिणाम होतो. भारताच्या एकूण खाद्यतेलाच्या वापरामध्ये सनफ्लॉवर ऑइलचा वाटा सुमारे 9% आहे. दरवर्षी क्रूड सनफ्लॉवर ऑइलचा वापर अंदाजे 3.0 दशलक्ष टन इतका आहे. यापैकी जवळपास 2.8 दशलक्ष टन गरज आयातीद्वारे भागवली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीतील बदल आणि जागतिक पुरवठ्याच्या परिस्थितीचा या बाजारपेठेवर विशेष प्रभाव पडतो.त्यावर पर्यायी तेलांच्या वापराच्या पद्धती आणि सनफ्लॉवर ऑइलची तुलनात्मक स्पर्धात्मकता यातून खाद्यतेलांच्या किमती एकमेकांशी घनिष्ठपणे जोडलेल्या आहेत. त्यामुळे परस्पर अधिकाधिक जोडल्या जाणाऱ्या खाद्यतेल बाजारपेठेत बाजारातील सहभागींसाठी किमतीतील जोखमीचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.हा करार सादर करण्याबाबत बोलताना MCX च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री प्रवीणा राय म्हणाल्या, “क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट सादर केल्यामुळे बाजारातील सहभागींना किमतीतील जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने एक्सचेंजवर व्यवहार करता येणारी यंत्रणा उपलब्ध होईल. त्याचबरोबर देशांतर्गत खाद्यतेल बाजारपेठेच्या विकासालाही यामुळे अधिक बळकटी मिळेल.” नवीन कराराची रचना आयातदार, रिफायनर्स, प्रक्रिया उद्योग, व्यापारी तसेच मूल्यसाखळीतील इतर सहभागींसाठी करण्यात आली आहे. किमतीतील अस्थिरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तसेच त्यांच्या जोखीम व्यवस्थापनाच्या धोरणांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा एक्सचेंजवर व्यवहार करता येणारा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा करार कॅश-सेटल्ड असेल. यामध्ये लागू विक्रीकर/GST वगळून Ex-Tank JNPT या आधारावर किमती निर्देशित केल्या जातील.क्रूड सनफ्लॉवर ऑइल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टच्या सादरीकरणामुळे MCX ची पारदर्शक आणि कार्यक्षम कमोडिटी बाजारपेठांना चालना देण्याची भूमिका आणखी मजबूत होईल. तसेच, मूल्यसाखळीतील सहभागींसाठी कमोडिटीच्या किमतीतील जोखीम अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.