मुंबई प्रतिनिधी
सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जी. पी. रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनतर्फे आयोजित “कार्डिओ-कॉन” परिषद अतिशय उत्साहात आणि यशस्वीपणे द ललित हॉटेल अंधेरी येथे पार पडली.
या परिषदेचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी “विशेष अतिथी” म्हणून केंद्र सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले उपस्थित होते.
या परिषदेला सुमारे १,४०० हून अधिक डॉक्टर्स आणि प्रतिनिधींनी हजेरी लावली. १६ जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह , चांदीची समई आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले.
या कार्यक्रमात हृदय कसे उत्तम ठेवावे कोणता व्यायाम करावा याबाबत सखोल मागदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात स्थानिक आमदार मुरजी पटेल,
प्रख्यात ऑस्कर पुरस्कार विजेते गायक सुखविंदर सिंग,
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते श्री. अन्नू कपूर, आणि पद्मभूषण प्रा. डॉ. ए. बी. मेहता व पद्मश्री प्रा. डॉ. सी. व्यंकट एस. राम (दोघेही नामांकित हृदयरोग तज्ज्ञ) यांनी आपल्या विशेष उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवली.
इतर प्रमुख पाहुण्यांमध्ये नगरसेवक श्री. प्रकाश मुसळे , रोहित शर्मा चे प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती





