ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Thursday, May 14, 2026 2:57 am

<br><br>काय होणार जेव्हा विश्वंभर समोर श्रावणी देणार आपल्या  प्रेमाची कबुली !<br><br>

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभ श्रावणी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांना दररोज नवनवीन धक्के पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक आता अशा टप्प्यावर आले आहे, जिथे श्रावणीचे प्राण वाचवण्यासाठी नियती स्वतः खेळ खेळताना दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत, श्रावणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला तातडीने दुर्मिळ अशा ‘ब्लड ग्रुप’ची गरज भासते. अशा कठीण समयी, श्रावणीने भूतकाळात ज्या गरीब महिलेला मदत केली होती, ती महिला मदतीसाठी धावून येणार आहे.

तर दुसरीकडे, कथानकात एक अनपेक्षित वळण येणार आहे. जेलमधून पळालेली वैशाली मृत अवस्थेत आढळते. या घटनेमुळे रुद्र प्रचंड संतापला असून विश्वंभर पूर्णपणे कोलमडून गेला आहे. श्रावणी आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना, शुभ भावूक होऊन तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. प्रकृती सुधारत असताना शुभ आणि श्रावणी एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. रुग्णालयातून घरी परतल्यावर श्रावणी आपल्या वडिलांना सुबुबद्दल सांगण्याचे ठरवते. मात्र, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत विश्वंभर श्रावणीचं रुद्रवर प्रेम असल्याचं समजतात, या मोठ्या गैरसमजामुळे नात्यांमध्ये एक नवीनच पेच निर्माण होणार आहे.

नात्यांचा हा गुंता आणि श्रावणीच्या आयुष्यातील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल. तेव्हा  ‘शुभ श्रावणी’चे आगामी भाग पाहायला विसरू नका, दररोज संध्या ६:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post

You May Also Like

No Posts Found!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology