केतन खेडेकर
भायखळा रेल्वे स्थानक हे दक्षिण मुंबईतील महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु या स्थानकाला बर्याच समस्यांनी वेढले आहे. या स्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि 2 वरील दादर दिशेकडील लिफ्ट बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून रेल्वे प्रवासी हैराण झाले आहेत.
सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये चढण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे लिफ्ट बंद असल्यामुळे पादचारी पलावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होत आहे. ही समस्या रुचीत झाल्यामुळे रेल्वे प्रवासी प्रचंड आहेरण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर येथील दोन्ही लिफ्ट दुरुस्त करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहे.
मी रोज याच लिफ्टने प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून प्रवास करतो. परंतु गेल्या अनेक आठवड्यापासून या ठिकाणी हे लिफ्ट दोन्ही बाजूची बंद असल्याने मला फार नाक त्रास करावा लागत असल्याची माहिती चाकरमानी दिलीप माने यांनी दिली.
या लिफ्टच्या छप्पर मधून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असल्याने शॉक सर्किट होऊन रेल्वे प्रवाशांना कोणतेही इजा होऊ नये यासाठी ही बंद ठेवली आहे. या लीपची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात सुरू असून येत्या दोन दिवसातच या लिफ्टचे काम संपूर्णपणे दुरुस्त होऊन ही लिफ्ट पुन्हा प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल अशी माहिती भायखळा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर गणेश स्वेन यांनी दिली.





