ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Monday, October 26, 2026 2:46 pm

लोकल टू ग्लोबल” : शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या ज्ञानयात्रेतून घडणाऱ्या नव्या नेतृत्वाची दिशा


दिनेश शिंदे
बी. कॉम. आयईएमबीए (युबीआय-युरोप)
राष्ट्रीय सह समन्वयक व मिडिया समन्वयक, शिवसेना*

“स्थानिक अनुभवांना जागतिक ज्ञानाची जोड आणि जागतिक दृष्टिकोनाला लोकाभिमुख कृतीची दिशा”,* आजच्या बदलत्या भारतासाठी नेतृत्वाची ही सांगड अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे *खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे*:यांची शैक्षणिक आणि सार्वजनिक जीवनातील वाटचाल पाहिली तर स्थानिक पातळीवरील सामाजिक वास्तव समजून घेत असताना व्यापक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भांचा अभ्यास करण्याची महत्वाची वाटचाल/ प्रक्रिया दिसून येतेय. जरी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी M.B.B.S. आणि M.S. (Orthopaedics) अशी आहे; तरी या पार्श्वभूमीवर *TRIUM Global Executive MBA* सारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील शिक्षणाचा अनुभव ही केवळ पदवी मिळवण्याची बाब न राहता *त्यांच्या नेतृत्वाच्या आधुनिक विचारविश्वाचा विस्तार करणारी प्रक्रिया* नक्कीच ठरू शकते. *London School of Economics and Political Science* च्या या अभ्यासक्रमात रणनीती, वित्त आणि नेतृत्वासोबत नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता, frontier markets आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व यांचा अभ्यासाचा अंतर्भाव असल्याने जगातील विविध देश आणि उद्योगांतील अनुभवी व्यक्ती एकत्र शिकतात, ही त्याची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

*”लोकलपासून ग्लोबल”दृष्टीचा विस्तार*

आजच्या काळात एखाद्या लोकप्रतिनिधी समोरची आव्हाने केवळ स्थानिक रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य किंवा रोजगारापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पुरवठा साखळी, ऊर्जा, हवामानबदल आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनावर होत आहे.

LSE च्या अलीकडील अभ्यासांमध्येही भू-राजकारण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील वाढते परस्परसंबंध अधोरेखित केले आहेत. जागतिक राजकीय घडामोडींचा परिणाम बाजारपेठा, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि धोरणात्मक निर्णयांवर होऊ शकतो.

म्हणूनच *“लोकल टू ग्लोबल”* हा केवळ आकर्षक शब्दप्रयोग नसून आजच्या सार्वजनिक नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक विचारविस्ताराचे प्रतीक म्हणून पाहता येतेय.

*ज्ञान म्हणजे केवळ पदवी नव्हे*

आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा खरा अर्थ केवळ परदेशातील नामांकित संस्थेत शिकणे एवढाच नसतो तर विविध देशांतील लोकांशी संवाद साधणे, वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक वास्तवांचा अभ्यास करणे, प्रश्नांकडे अनेक दृष्टिकोनांतून पाहणे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतंत्र विचार विकसित करणे, ही त्याची खरी ताकद आहे.

TRIUM कार्यक्रमाची रचना देखील जागतिक अनुभवावर भर देते. LSE मध्ये विविध राष्ट्रीयता व उद्योगांतील अनुभवी व्यावसायिकांचा देखील सहभाग असतो.

अशा वातावरणातून मिळणारा अनुभव सार्वजनिक जीवनात उपयोगी ठरू शकतो, कारण धोरणनिर्मिती ही एका प्रश्नाचे एकच उत्तर शोधण्याची प्रक्रिया नसते. त्यात अर्थव्यवस्था, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, प्रशासन आणि नागरिकांच्या अपेक्षा यांचा परस्परसंबंध समजून घ्यायला वाव मिळत असतो.

*युवा नेतृत्वासाठी अभ्यासाची दिशा*

युवा नेतृत्वाची खरी कसोटी केवळ उत्साहात नसते; ती अभ्यास, संवाद, निर्णयक्षमता आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेत असते.

*डॉ. श्रीकांत शिंदे* यांच्या बाबतीत वैद्यकीय शिक्षणातून विकसित झालेला शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन, सार्वजनिक जीवनातील अनुभव आणि आता *आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन व भू-राजकारणाच्या अभ्यासातून मिळणारा व्यापक दृष्टिकोन;* या विविध अनुभवांची सांगड त्यांच्या सार्वजनिक भूमिकेला अधिक व्यापक बौद्धिक चौकट देऊ शकेल.

याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम असा असू शकतो की, स्थानिक प्रश्नांकडे पाहताना केवळ तात्कालिक उपाय न शोधता त्यामागील मोठ्या आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक घटकांचाही विचार करायला संधी निर्माण होत असते.

*लोकाभिमुख नेतृत्वाची खरी दिशा*

जागतिक ज्ञानाचा अंतिम उपयोग जर सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी होणार असल्याने या  ज्ञानाला नक्कीच सार्वजनिक अर्थ प्राप्त होऊ शकेल.

आजच्या भारताला अशा नेतृत्वाची गरज आहे जे एका बाजूला जागतिक स्तरावरील बदल समजून घेईल आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी जोडलेले राहील.

उत्तम पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, आधुनिक आरोग्यव्यवस्था, कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, शाश्वत शहरी विकास, शिक्षण आणि युवा संधी; या प्रत्येक क्षेत्रात जागतिक अनुभवांचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबी स्थानिक गरजांनुसार स्वीकारण्याची आज आवश्यकता आहे.

*जागतिक विचार आणि स्थानिक कृती* यांची सांगड हीच भविष्यातील लोकाभिमुख विकासाची महत्त्वाची दिशा ठरू शकते.

*भारताच्या प्रगतिशील युवा नेतृत्वाची गरज*

भारत आज जगातील महत्त्वाच्या आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक शक्तींमध्ये आपले स्थान अधिक दृढ करण्याच्या प्रक्रियेत आहे. अशा काळात भारत देशातील सार्वजनिक उच्च नेतृत्वाने केवळ वर्तमानाचा विचार न करता पुढील दशकातील आव्हाने आणि संधी ओळखणे आवश्यक आहे असे वाटतेय.

*कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा, जागतिक व्यापारातील बदल, आरोग्य तंत्रज्ञान, कौशल्याधारित रोजगार आणि शहरीकरण ही क्षेत्रे भविष्यातील भारताची दिशा ठरविणार आहेत.* म्हणूनच राजकिय दुरदृष्टी म्हणजे केवळ मोठी स्वप्ने पाहणे नव्हे; तर भविष्यातील बदलांचा अभ्यास करून आज योग्य प्रश्न विचारणे आणि त्यानुसार कृतीची दिशा ठरवणे अत्यावश्यक ठरेल यात दुमत नसावे असे वाटते.

वरील सगळ्या बाबींचा सारासार सुक्ष्म विचार करायचा झाल्यास *“लोकल टू ग्लोबल”* ही संकल्पना एका व्यक्तीच्या शैक्षणिक प्रवासापुरती मर्यादित न राहता आजच्या *भारतातील नव्या नेतृत्वाच्या अपेक्षांचे प्रतीक* बनू शकते.

स्थानिक मातीशी जोडलेली नाळ, आंतरराष्ट्रीय ज्ञानाची व्यापकता, तंत्रज्ञानाची जाण, विविध विचार ऐकण्याची तयारी आणि नागरिककेंद्रित विकासाची बांधिलकी; या घटकांची सांगड घातली तर सार्वजनिक नेतृत्व अधिक अभ्यासपूर्ण, आधुनिक आणि भविष्याभिमुख होऊ शकते.

*डॉ. श्रीकांत शिंदे यांची ही ज्ञानयात्रा* अशा व्यापक विचारप्रक्रियेच्या दृष्टीने पाहता येते. *कारण खरे नेतृत्व केवळ आजच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही; ते उद्याचे प्रश्न ओळखण्यासाठी समाजाला तयार करते.*

👉🏾 *स्थानिक अनुभवातून जागतिक दृष्टीकडे…*
👉🏾 *जागतिक ज्ञानातून लोकाभिमुख कृतीकडे…*
*आणि 👉🏾 आजच्या नेतृत्वातून उद्याच्या भारताकडे!*

*“ज्ञान व्यापक असावे, विचार स्वतंत्र असावा आणि विकासाचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक असावा.”* हेच ओळखून डॉ. श्रीकांत शिंदे यशाकडे जाणारी वाटचाल करीत आहेत. शिवसेनेच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत व अभ्यास करणा-या या युवा नेतृत्वास माझ्याकडून तसेच तमाम शिवसैनिकांकडून मनपुर्वक शुभेच्छा !! ⛳️

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology