ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Monday, October 26, 2026 2:45 pm

*शेळी-मेंढी व बकऱ्यांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी स्वतंत्र SOP तयार करा; हाजी अरफात शेख यांची मंत्री पंकजा मुंडे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी*



मुंबई प्रतिनिधी:

महाराष्ट्रातील शेतकरी, पशुपालक, व्यापारी तसेच खाटीक समाजातील नागरिकांना शेळी-मेंढी व बकऱ्यांची कायदेशीर वाहतूक करताना वारंवार होणारा नाहक त्रास, आर्थिक शोषण आणि अनावश्यक अडथळे रोखण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र व वैज्ञानिक कार्यप्रणाली (SOP) लागू करावी, अशी मागणी ‘राज्य मुस्लिम खाटिक समाज सेवा संस्थे’चे अध्यक्ष तथा भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
राज्यातील देवनार पशुवधगृहासह विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी तसेच पशुपालनासाठी शेळी-मेंढ्यांची कायदेशीर वाहतूक केली जाते आणि या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, वाहतुकीदरम्यान वाहनांना विनाकारण अडवून शेतकरी व व्यापाऱ्यांचे मानसिक आणि आर्थिक शोषण केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील प्रमुख महामार्गांवर जनावरांसाठी चारा, पाणी, सावली आणि प्राथमिक वैद्यकीय सोयींनी युक्त अशी अधिकृत विश्रांती केंद्रे (Animal Transit Rest Points) उभारण्यात यावीत. तसेच शेळी-मेंढ्यांच्या वाहतुकीसाठी राज्यस्तरीय एकसमान वैज्ञानिक नियमावली तयार करून परिवहन, पशुसंवर्धन, पोलीस व आरटीओ विभागांना तिचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले जावेत. कायदेशीर कागदपत्रे बाळगणाऱ्या वाहतूकदारांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेतानाच पशुकल्याण व व्यापाऱ्यांचे हक्क यांचा समतोल राखणारी पारदर्शक यंत्रणा उभी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय, या विषयावर दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि व्यापारी प्रतिनिधींची एक संयुक्त समिती गठीत करावी, अशी विनंतीही हाजी अरफात शेख यांनी केली आहे.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology