मुंबई प्रतिनिधी
डॉ. जी. पी. रत्नपारखी यांच्या ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’ च्या डॉ. शशांक शहा, डॉ. स्मृती रत्नपारखी, श्रीमती दीपा श्रॉफ आणि डॉ. गजानन रत्नपारखी यांचा समावेश आलेल्या टीमच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील विविध आदिवासी शाळांना सस्नेह भेट देऊन विद्यार्थ्यांना* थंडीपासून बचाव करण्यासाठी सतरंजी व ब्लँकेट वितरण करण्यात आले. तसेच अनेक आदिवासी महिलांना दिवाळी भाऊबीज भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. विक्रमगड परिसरामध्ये हिवाळ्यात तीव्र आणि अतिशय बोचणारी थंडी असते. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सदर ब्लँकेटची मदत अत्यंत मोलाची ठरेल. यापुढे देखील आम्ही विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सदैव अग्रेसर राहून त्यांना मदत करू अशी माहिती ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी दिली.
याप्रसंगी उपस्थित शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थी व महिलांना वेळेवर मिळालेल्या या योग्य मदतीबद्दल मनापासून आभार मानले आणि उपक्रमाचे कौतुक केले.





