मुंबई : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, या संदेशाचा प्रसार करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिं. वामनराव महाडिक उद्यान, परळ येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना युवा नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पर्यावरणाचे रक्षण, वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याची गरज यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी एफ-साऊथ विभागाच्या महापालिका प्रशासनाकडून विशेष सहकार्य लाभले. गार्डन विभागाच्या अधिकारी सौ. शर्वरी घोलप मॅडम, श्री. भोसले सर तसेच कॉन्ट्रॅक्टर श्री. पटेल सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी शिवसेना शिवडी विधानसभा महिला विभाग प्रमुख व शिवस्वराज्य सेनेच्या सचिव सौ. रेशमा सकपाळ गावकर, वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मोहन वायदंडे, शिवस्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्ता सौ. सुषमा सकपाळ राऊत, नेरूळ शहर अध्यक्ष श्री. धनाजी जगताप, राष्ट्रीय केबल सेनेचे सचिव श्री. राजेश जैन, शिवसेना दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण कक्ष संपर्क प्रमुख श्री. जगदीश नलावडे, स्थानीय लोकाधिकार सेनेचे उपाध्यक्ष श्री. दीपक कलिंगन, स्वाद केटरर्सचे सर्वेसर्वा श्री. नितीन कोलगे, लायन दिलीप वरेकर, लायन नीरजा सकपाळ, लायन नंदकुमार बागवे, लायन संजू सासमाल, श्री. नील सकपाळ, श्री. सोपान शेट्ये यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. भविष्यातही अशाच लोकहितकारी व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा वसा कायम ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.





