मुंबई प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा, मनसे आणि काँग्रेस यांनी आज सभागृहात विद्यार्थ्यांना न्याय द्या यासाठी सभागृह सुरू होताच निषेध व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक होणाऱ्या वागणुकीबाबत विरोधकांनी सभागृहामध्ये देखील मोठ्या आवाजात निषेध केला. यामध्ये त्यांनी चौकीदार चोर आहे, नरेंद्र मोदी हाय हाय या घोषणांनी महापोलीचे तेवढे यांना देखील प्रश्न विचारले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे असे प्रत्युत्तर दिले. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला. परंतु महापौर रितू तावडे यांनी
सभागृहाचे कामकाज सुरूच ठेवले. या आंदोलनामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक निशिकांत शिंदे, किरण तावडे, राजोल पाटील, विरोधी पक्ष नेत्या किशोरी नपेडणेकर, मनसे आणि काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.




