ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, June 13, 2026 10:16 am

मनसेचे भायखळा येथील वॉर्ड अध्यक्ष किरण टाकळे यांचा शिवसेनेत प्रवेश


केतन खेडेकर
भायखळा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र. २०८ चे शाखाध्यक्ष किरण टाकळे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते यशवंत जाधव आणि स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनीताई जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रेरित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी किरण टाकळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून जनसेवा, विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या संकल्पाचे स्वागत करत त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. टाकले यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा यावेळी संकल्प व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामध्ये उपशाखा अध्यक्ष संतोष तांबोळी, संदीप साळुंखे, महेश शिंदे, कैलास पटेल, गणेश दिघे, गटाध्यक्ष सिद्धेश हांडे, आकाश दीक्षित, महाराष्ट्र सैनिक जीवन दंत, संतोष सिंग, सिद्धेश कुरपे, कल्पेश पाटेकर, पंकज जैस्वाल, यज्ञेश चव्हाण, सचिन कुरपे, बाळा नवघणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली.
भायखळा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या जनाधारात सातत्याने होत असलेली वाढ, पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवरील जनतेचा दृढ विश्वास आणि मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरील निष्ठा यांचे हे आणखी एक प्रभावी उदाहरण असून, या पक्षप्रवेशामुळे भायखळा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना संघटना अधिक सक्षम व बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी *उपविभागप्रमुख परेश कुवेसकर* यांनी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी मा. सिनेट सदस्य निखिल यशवंत जाधव,
उपविभागप्रमुख परेश कुवेसकर, उपसमन्वयक संकेत सांगळे, शाखाप्रमुख राजा म्हात्रे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology