मुंबई प्रतिनिधी
इथे शिकून अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.
या शाळेत आज होता शाळेत नव्याने येणाऱ्या चिमुकल्यांचा अनोखा “प्रवेशोत्सव”
इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक चिमुकल्या पावलांचे कुंकूमतीलकाने पाय भिजवून त्याचे ठसे घेतले गेले. कायम स्मृती ठेवावा असा क्षण!
एक अभिमानास्पद परंपरा!!!
आज हा सोहळा याची देही याची डोळा साक्षीभूत करण्यासाठी चौक मधील अनेक नामांकित मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सरपंच होते. पोलीस अधिकारी होते ज्येष्ठ नागरिक होते व्यापारी होते सर्वसामान्य नागरिकही आले होते.
हा सर्व सोहळा यशस्वी झाला तो मुख्याध्यापक महेंद्र नाईक आरती नाईक आणि सहकारी प्रियांका टेकाळे, आफरीन पठाण यांच्या मेहनती मुळे
या सर्वांचे योगदान अविस्मरणीय आहे.या कार्यक्रमासाठी
चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार आणि सहकारी,सरपंच रितू ठोंबरे
जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र नाईक
जनकल्याण बँकेचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे,कीर्ती ठाकरे,सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. मिलिंद भगत,नेताजी पालकर व्यापारी संघांचे हर्षल हनुमंते,ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षा अलका विरभद्रे , यशवंत सकपाळ, मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्राम पंचायत सदस्य सुभाष पवार,रंजना साखरे, राजेंद्र चौधरी, सरिता चौधरी,अनिल मोरे, प्रदीप वीरभद्रे, अंजली घोडके,सुदेश महागाव,उपसरपंच,पूजाताई हातमोडेआणि पत्रकार शेखर छत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.





