मुंबई प्रतिनिधी
शिवसेना वरळी विधानसभा आणि नगरसेविका वनिता नरवणकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 5 जुलै, 2029 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत सनवेल गरवारे बँक्वेट हॉल, लाला कॉलेज, हाजीअली, मुंबई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती सचिन अहिर हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व विभागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागि व्हावे. असे जाहीर आवाहन वरळी विधानसभेचे विभागप्रमुख दत्ता नरवणकर, समन्वयक प्रशांत गवस यांनी केले आहे.




