ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Thursday, May 14, 2026 2:08 am

Vivek Oberoi : ‘महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ’ विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट, म्हणाला, ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयनं सुनेत्रा पवार यांच्यासाठी पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई – बारामती पोटनिवडणुकीत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २.१४ मतांनी विजय मिळवला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडली आणि सुनेत्रा पवार विजयी झाल्या. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर या पोस्टच्या शेवटी अभिनेत्यानं मराठीमध्ये एक ओळसुद्धा लिहिली आहे.

विवेक ओबेरॉयची पोस्ट

विवेक ओबेरॉयनं इन्स्टाग्रामवर सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘सुनेत्रा वहिनी, अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव, त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक बारामतीकरांच्या मनात कायम राहणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे, ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. दादांनी राबवलेले विविध उपक्रम, त्यांचं सामान्य लोकांवर असलेलं प्रेम आणि त्यांची जिद्द यामुळेच ते खरे ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जात होते आणि आज त्यांच्या अर्धांगिनीवर जनतेनं दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हीच योग्य वारसदार आहात.’

महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ

‘तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा नक्कीच सुवर्णकाळ ठरेल…कारण, ‘सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!’ असं विवेकनं शेवटी म्हटलं आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निकालात २ लाख १८ हजार ९३० मतं मिळाली असून त्यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजित पवार यांच्या निधनानंतरची ही माझी पहिलीच निवडणूक आहे. मला ही निवडणूक लढवावी लागेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. बारामतीच्या जनतेचं प्रेम आणि मतं ही अजित दादांना खरी आदरांजली आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.’ सुनेत्रा पुढे म्हणाल्या, ‘बारामती हे माझं कुटुंब आहे. शरद पवार यांच्यासह मला मिळालेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी जनतेसाठी काम करत राहीन आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’

webittrio@gmail.com

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

No Posts Found!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology