ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Thursday, May 14, 2026 12:59 am

एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश


मुंबई प्रतिनिधी

    मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.कंत्राटी कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या कामाचे तास निश्चित करावेत,सकस भोजनाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणे, चित्रीकरण स्थळी स्वच्छता राखणे, महिला कलाकारांसाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची सुविधा तसेच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांवर  चर्चा करण्यात आली.

गेल्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान  औचित्याच्या मुद्द्याद्वारे चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रशासनाने कार्यवाही न केल्याने आमदार सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली.
       शासनाच्या  मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत चित्रनगरी प्रशासनाने संबंधित निर्मिती संस्थांना यापूर्वी सूचना देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी उपाध्यक्षांनी दिल्या. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.राज्यातील सुमारे ५ लाख कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या हितासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
    या बैठकीत आमदार सुनील प्रभू,फिल्म सिटी च्या व्यवस्थापकीय संचालक  स्वाती म्हसे पाटील, फिल्मसिटी चे  सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव महेश वाव्हळ तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

No Posts Found!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology