मुंबई प्रतिनिधी – भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाचा जागर भारतानंतर आता प्रथमच परदेशातील लंडनच्या संसदेत होणार आहे.भारतासह देशविदेशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बायोपिकसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात येणार असल्याची माहीती या कार्यक्रमाचे आयोजक बोधिसत्व फाऊंडेनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे व बीबीएमजी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस, लंडन यूके. यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परीषदेत दिली.
बीबीएमजी फाउंडेशन लंडन यूके आणि बोधिसत्व फाउंडेशन मुंबई भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला अर्पण केलेले भारतीय संविधान यांना नुकतेच ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम येत्या २७ एप्रिल २०२७ ते १ व २ मे २०२७ असा लंडनमधील संसदेत घेण्यात येणार आहे. भारत, जपान, कंबोडीया थायलंड, लंडन, श्रीलंका, फ्रांस, साऊथ कोरीया येथील मंत्री, खासदार, राजदूत तसेच उद्योगपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच बरोबर भारतामधून अनेक दिग्गज मान्यवर मंत्री, खासदार, उपस्थित राहणार आहेत.
बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांची आंदोलने, त्यांचा वारसा आणि त्यांची दूरदृष्टी, ग्रंथसंपदा यांना समर्पित अशा एका महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन लंडन यूके येथे करण्यात येत आहे. या अंतर्गत लंडन आणि लीसेस्टर येथे विशेष ‘थिएट्रिकल सादरीकरण’ (नाट्यमय सादरीकरण) सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून, लंडन येथील संसदेत ‘इंडो-यूके फ्री ट्रेड समिट – Chapter 10’ (Indo-UK Free Trade Summit – Chapter 10 ) चे आयोजन करण्यात आले आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारत यूके मधील प्रमुख उद्योगपती, उद्योजक आणि संबंधित क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना या परिषदेद्वारे एकत्र येणार आहेत.
सामाजिक समानता, सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक सहकार्य आणि भारत-यूके संबंध अधिक बळकट करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहीती यावेळी आयोजक बीबीएमजी फाउंडेशन लंडन यूके आणि बोधिसत्व फाउंडेशन मुंबई, भारत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत दिली. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून
भारतातून केंद्रीय मंत्री किरण रेजुजी, केंद्रीय मंत्री . पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मा. रामदास आठवले,.सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, .लंडन येथून माजी प्रधानमंत्री ऋषी सुनक, खासदार वीरेंद्र शर्मा, खासदार रामी रेनजर, माजी महापौर सुनील चोप्रा, होली ग्रुपचे चैरमन विजय गांधी, खासदार बॉब ब्लाकमेन, खासदार गणेथथोमस, उद्योजक रंगदात, महापौर तुषार थाईलंड येथून माजी प्रधानमंत्री प्रवित वोन्सुवोन, सौरक्षण मंत्री आडूल बून्थम्चरोएन श्रीलंका येथून माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.





