केतन खेडेकर
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रक्षाबंधनाचे औचित्य साधून समाजातील दुर्लक्षित असलेला देहव्यापार करणा-या भगिणींसाठी शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कामाठीपुरा ११ वी गल्ली, आर. एस. निमकर मार्ग, नागपाडा, मुंबई रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात आठवले हे स्वतः या भगिणींकडून राखी बांधून घेऊन त्यांच्याशी आपुलकीचे आणि बंधुत्वाचे नाते जपणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये भगिणींसाठी साडीवाटप आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. तसेच विभागातील नागरिकांसाठी आणि देहविक्रीय करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबीर देखील आयोजीत केले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पवार आणि मुंबादेवी तालुका अध्यक्ष युवानेता विशालभाई दिवार यांनी केले आहे.





