केतन खेडेकर
शिवसेना भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक 208 यांच्या वतीने गुरुवार दि. 27 ऑगस्ट, 2026 सायं. ६ ते रात्रौ, १० वा. पर्यंत स्थळ : न्यू हिंद मिल म्हाडा संकुल समोर, फेरबंदर,मुंबई- 400033 येथे दहीहंडी सराव शिबिराचे
आयोजन करण्यात आलेले आहे. हा फक्त दहीहंडी उत्सव नसून “मराठमोळ्या संस्कृतीचा जागतिक किर्तीमान” आहे. आपली संस्कृती आपणास जोपासली पाहिजे या हेतूने आम्ही या दही आणि सराव शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात सर्व गोविंदा पथकांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.
तरी या सोहळ्यास आपण उपस्थित राहून, आम्हां सर्व मराठी जनांचा आणि सर्व गोविंदा पथकांचा आनंद, उत्साह द्विगुणित करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन
भायखळा विधानसभा उपविभागप्रमुख आयोजक परेश कुवेसकर यांनी केले आहे.





