मुंबई प्रतिनिधी
लालबाग पुलावरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला फार पुढे जाऊन टर्न मारावा लागत आहे त्यामुळे रुग्णांचा बराचसा वेळ यामुळे फुकट जात असून त्वरित उपचार मिळण्यास विलंब होत आहे. ही दखल घेऊन शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग करा अशी मागणी वाहतूक विभागाकडे केली.
लालबाग पुलावरून येणारी ॲम्बुलन्स तसेच भारतमाता परिसरातून येणाऱ्या ॲम्बुलन्स मधून येणारे रुग्ण यांना केईएम रुग्णालयाला जाण्यासाठी टाटा हॉस्पिटल-शेतकरी पेट्रोल पंप येथून वळसा घालून यावे लागते आणि गौरीशंकरच्या सिग्नलला प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असते. त्यामुळे ॲम्बुलन्स आणि रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खूप त्रास होत आहे, याची घेऊन दखल घेऊन माजी प्रभाग समिती अध्यक्ष शबबन कनावजे आणि सहकाऱ्यांसमवेत उपायुक्त परिमंडळ 2 श्री सकपाळे साहेब यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती समजावून सांगून त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार सेंट्रल रेल्वे मैदाना समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर एक सिग्नलची व्यवस्था करून केईम रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसाठी आणि वाहनांसाठी एक लेन उपलब्ध करून द्यावी, असे निवेदन देऊन विनंती करण्यात आली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या ठिकाणी स्वतंत्र मार्ग रुग्णवाहिकेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी दिली.





