मुंबई प्रतिनिधी
प्रभादेवी येथील मूर्तिकार पूजा मोहिते यांच्या मूर्ती कार्य शाळेवर महानगरपालिकेने कारवाई केली. त्यानंतर या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिच्या गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेवर महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे ती व्यथित झाल्याचे दिसून आले.
ही बाब समजताच स्थानिक नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित तरुणीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत तिला न्याय मिळवून दिला. तसेच साहेब महापालिका आयुक्त स्वप्न मॅडमची भेट घेऊन या तरुणीची व्यथा त्यांना सांगितली. त्यानंतर महानगरपालिकेने देखील अशा मूर्ती कार्यशाळेवर कोणतेही कार्यवाही करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे या तरुणीला मोठ्या प्रमाणात दुधाचा मिळाला आणि तिने शिवसेनेचे नगरसेवक निशिकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानले.





