मुंबई प्रतिनिधी
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती ते कोल्हापूर संस्थांचे महान समाज सुधारक लोक कल्याणकारी राजा आणि बहुजन समाजासाठी त्यांच्या उद्धारासाठी जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केले बहुजन समाजासाठी ५०% आरक्षण त्यांनी केलं जातिभेद निर्मूलन शिक्षण प्रसार शेती आणि उद्योग क्षेत्रामध्ये क्रांती व्यापार कला व क्रीडा क्षेत्रामध्ये राजाश्रय इत्यादी महान कार्यामुळे त्यांची जयंती निमित्त आजचा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो मुंबईतील तेरावी खेतवाडी येथे त्यांचे निधन झाले. त्या जागी त्यांच्या स्मृतीसाठी शिल्प उभे केले आहे. त्या जागी आज आदरांजली देण्यात आली. सदर प्रसंगी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविकांत बावकर काँग्रेस ज्येष्ठ नेते अरुण वाशिर्डे आणिg अभिमन्यू नागरे आणि राहुल सिंह तसेच ब्लॉक अध्यक्ष भावेश परमार, संकेत ठीक, प्रज्ञा जाधव, नरेश मोरे, शामराव मोहिते, विशाल सोनवणे आणि राजू गायकवाड उपस्थित होते





