ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Tuesday, July 28, 2026 3:40 pm

धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास आमचा जाहीर विरोध <br>महापालिका काँग्रेस गटनेते अशरफ आजमी


मुंबई प्रतिनिधी
महापालिकेच्या सभागृहात धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास प्रस्ताव आला होता परंतु काँग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला असून आम्ही मुंबईकरांची जमीन अदानीच्या संबंधित असणाऱ्या नवदीप डेवलपर्सला कदापि देणार नाही . तर त्यास आम्ही कडाडून विरोध करणार असे जाहीर प्रतिपादन महापालिका काँग्रेस गटनेते अश्रफ आजमी यांनी केले. याआधी आम्ही माहीम बस डेपोची जागा एका खाजगी विकासाला दिली होती परंतु त्याने महापालिकेला देण्यात येणाऱ्या 98 कोटी रुपये अजूनही दिलेले नाही. आता त्या जागेची किंमत 400 ते 500 करोड रुपये झाले आहे त्यामुळे महापालिकेला फार मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे. हा तोटा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही याला कडून विरोध करणार. तसेच धारावीचा पुनर्विकास हा अदानी करणार आहे परंतु त्यांना त्यांचे पुन्हां वसन्न मानखुर्द आणि गोवंडी येथे काढण्यात असल्याने आधीच लोकांमध्ये याबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामध्ये हा धारावी डेपो जी साडेअकरा एकर जमीन आहे ती अदानीच्या संबंधित असणाऱ्या मेसेस  नवदीप डेव्हलपर्स या विकासकाला देणार म्हणजे तेलही गेले आणि तूपही गेले आपल्या अति धोंडा राहणार असे आमचे स्पष्ट मत आहे. हा धारावीचा बस डेपो या खाजगी विकासाकरणांनी देता महापालिकेने स्वतः डेव्हलप केला तर या जागी महापालिकाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण होईल आमची हीच मागणी आहे की महापालिकेने हा डेपो पीपीपी तत्त्वावर न देता स्वतः डेव्हलप करावा.
महापालिका प्रशासनाने आज हा धारावी डेपोचा विषय न आणता चेंबूर येथील झालेल्या दुर्घटनेच्या बाबतीत बोलले पाहिजे होते परंतु महापालिका अशा विषयांपासून आता दूर चालली आहे. तसेच महापालिका आपली जबाबदारी पासून दूर पळत आहे.  त्यामुळे आम्ही आज महापालिकेची सभा त्याग केला असून याचा आम्ही निषेध करतो अशी माहिती काँग्रेस महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनी दिली.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology