मुंबई प्रतिनिधी
महापालिकेच्या सभागृहात धारावी बस डेपो पीपीपी तत्त्वावर देण्यास प्रस्ताव आला होता परंतु काँग्रेस पक्षाने याला कडाडून विरोध केला असून आम्ही मुंबईकरांची जमीन अदानीच्या संबंधित असणाऱ्या नवदीप डेवलपर्सला कदापि देणार नाही . तर त्यास आम्ही कडाडून विरोध करणार असे जाहीर प्रतिपादन महापालिका काँग्रेस गटनेते अश्रफ आजमी यांनी केले. याआधी आम्ही माहीम बस डेपोची जागा एका खाजगी विकासाला दिली होती परंतु त्याने महापालिकेला देण्यात येणाऱ्या 98 कोटी रुपये अजूनही दिलेले नाही. आता त्या जागेची किंमत 400 ते 500 करोड रुपये झाले आहे त्यामुळे महापालिकेला फार मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे. हा तोटा पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही याला कडून विरोध करणार. तसेच धारावीचा पुनर्विकास हा अदानी करणार आहे परंतु त्यांना त्यांचे पुन्हां वसन्न मानखुर्द आणि गोवंडी येथे काढण्यात असल्याने आधीच लोकांमध्ये याबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामध्ये हा धारावी डेपो जी साडेअकरा एकर जमीन आहे ती अदानीच्या संबंधित असणाऱ्या मेसेस नवदीप डेव्हलपर्स या विकासकाला देणार म्हणजे तेलही गेले आणि तूपही गेले आपल्या अति धोंडा राहणार असे आमचे स्पष्ट मत आहे. हा धारावीचा बस डेपो या खाजगी विकासाकरणांनी देता महापालिकेने स्वतः डेव्हलप केला तर या जागी महापालिकाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण होईल आमची हीच मागणी आहे की महापालिकेने हा डेपो पीपीपी तत्त्वावर न देता स्वतः डेव्हलप करावा.
महापालिका प्रशासनाने आज हा धारावी डेपोचा विषय न आणता चेंबूर येथील झालेल्या दुर्घटनेच्या बाबतीत बोलले पाहिजे होते परंतु महापालिका अशा विषयांपासून आता दूर चालली आहे. तसेच महापालिका आपली जबाबदारी पासून दूर पळत आहे. त्यामुळे आम्ही आज महापालिकेची सभा त्याग केला असून याचा आम्ही निषेध करतो अशी माहिती काँग्रेस महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनी दिली.





