मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे जाहीर प्रतिपादन करीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी या अफवांना पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, आमच्या पक्षांमध्ये योग्य समन्वय असून आम्ही नेहमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो. परंतु गेल्याच एक-दोन दिवसात प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्या चर्चेतून अफवांचे निष्पन्न झाले असल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहे. परंतु अशी कोणतीही चर्चा झालेली नसून ही फक्त अफवा असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच पार्थ पवार हे पक्षाचे नवीन चेहरे असून ते देखील पक्षामध्ये विविध भूमिका घेत असतात. परंतु अशा प्रकारची कोणतीही चर्चा आमची पक्षातील पदाधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी झालेली नाही, असा खुलासा तटकरे यांनी यावेळी केला.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना खासदार तटकरे यांनी, एखाद्या मुरब्बी नेत्याला शोभतील अशी, समाधानकारक उत्तरे दिली.






