मुंबई प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष रुकेश भालेराव यांनी भव्य दिव्य रिपाइ दहीहंडीचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ सकाळी ११ ते रात्री १० वा. पर्यंत जे वॉक जिम, कफ परेड,कुलाबा (मुंबई) येथे केले आहे. या दहीहंडीमध्ये सर्व गोविंदा पथकांसाठी सात लाखाची रोख रक्कमआकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्हे आठवण आली आहेत. मराठी संस्कृती जपणे आणि आपले पारंपरिक सण साजरे करणे आपला अभिमान आहे. ही संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही या दहीहंडीचे आयोजन केले असून सर्व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने या दहीहंडीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक रुकेश भालेराव यांनी केले आहे.





