मुंबई प्रतिनिधी
आम्ही स्वाभिमानी कुलाबाकर प्रतिष्ठानचे आयोजक एड दीपक पवार यांनी भव्य दिव्य भ्रष्टाचारमुक्त दहीहंडीचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ सकाळी ११ ते रात्री १० वा. पर्यंत सुजाता बार समोर, लाला निगम रोड,कुलाबा (मुंबई) येथे केले आहे. या दहीहंडीमध्ये सर्व गोविंदा पथकांसाठी रोख रक्कमआकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. मराठी संस्कृती जपणे आणि आपले पारंपरिक सण साजरे करणे आपला अभिमान आहे. ही संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही या दहीहंडीचे आयोजन केले असून कुलाबा भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सर्व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने या दहीहंडीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक एड दीपक पवार आणि आयोजिका तेजल पवार यांनी केले आहे.





