ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Thursday, August 27, 2026 3:21 pm

नोटाबंदीनंतर अमित शहा यांनी गुजरातमधील बँकेमध्ये तीन दिवसात 700 कोटी रुपये सफेद केले. मनोरंजन रॉय यांचा आरोप

  मुंबई प्रतिनिधी,

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये एका को-ऑपरेटिव्ह बँकेतून तीन दिवसांमध्ये काळा पैसा सातशे कोटी रुपये कसे काय सफेद अधिकृत केले, तसेच रिझर्व्ह बँकेच्या चलनी नोटा छपाईमध्ये 2016 ते 2026 या कालावधीत मोठी   तफावत नोंद आढळून आली असून मोठा भ्रष्ट्राचार गोंधळ दिसून आला असल्याचा  गौफ्यस्फोट लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी आज प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांच्यासोबत तिवारी आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.             ‌‌.             पत्रकारांशी बोलताना मनोरंजन रॉय म्हणाले की, रिझर्व्ह बँकेच्या 2016 ते 2026 वार्षिक अहवालामध्ये 70 अब्ज 54 कोटी 82 हजार नोटा सार्वजनिक चलनात आहेत. सन 2018 ते 2025 या कालावधीत 23 अब्ज 40 कोटी 57 लाख नोटा खराब झाल्याने त्या नष्ट करण्यात आल्याचे रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले. आरबीआयच्या अहवालानुसार सार्वजनिक चलनामध्ये नोटांची संख्या 47 अब्ज 14 कोटी 25 लाख इतकी असायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात 2026 च्या  आरबीआयच्या सार्वजनिक अहवालामध्ये चलनातील नोटांची संख्या 70 अब्ज 54 कोटी 82 लाख एवढी दाखविण्यात आली आहे. 47 अब्ज आणि 70 अब्जमध्ये  चलनातील नोटांची एवढी तफावत काळा पैसा व्हाईट  करण्यासाठी वापरली जात आहे का? असा  गंभीर सवाल मनोरंजन रॉय यांनी व्यक्त केला आहे. आरबीआयच्या चलनी नोटांच्या छपाईच्या दिलेल्या आकडेवारीची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी नेमण्यात यावी, अशी मागणी ही मनोरंजन रॉय यांनी बोलताना केली आहे. 2016 पूर्वी जेव्हा सुमारे 69 अब्ज नोटा चालनात होत्या, तेव्हा नोटाबंदी करण्याची गरज का पडली? त्याचे गौडबंगाल स्पष्ट झाले पाहिजे, असेही रॉय यांनी सांगितले. आरबीआयच्या 2018 ते 2025 या कालावधीत 23 अब्ज 40 कोटी 57 लाख खराब झालेल्या नोटा नष्ट करण्यात आलेल्या असतील तर गणनेनुसार प्रत्यक्ष सार्वजनिक चलनातील नोटांची संख्या 47 अब्ज 17 कोटी 25 लाख इतकी असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार सार्वजनिक चलनातील नोटांची संख्या 47 अब्ज 54 कोटी 82 हजार एवढी दाखविण्यात आली आहे, त्यामुळे आरबीआय चलनी नोटा छपाई केंद्रांनी दिलेल्या आकडेवारीची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, त्यासाठी 15 ऑगस्ट 2026 नंतर दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यासाठी आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती ही मनोरंजन रॉय यांनी शेवटी बोलताना दिली.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology