ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, June 6, 2026 8:00 am

नीट पेपर लिक प्रकरणाबाबत भेंडी बाजार येथे झाली जनजागृती मोहीम


मुंबई प्रतिनिधी :
मुंबादेवी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्यायाची मागणी करण्यासाठी भेंडी बाजार येथे जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानास विद्यार्थ्यांचा तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशात NEET परीक्षेचे पेपर लीक होण्यासारखे गंभीर प्रकार घडत असून, हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला मोठा कलंक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यावर मौन बाळगत असल्याची टीका करण्यात आली. हा विद्यार्थ्यांचा तसेच संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याचे मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, पुढील काळातही अशाच प्रकारचे अभियान सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती मुंबादेवी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष जुनैद कुरेशी यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.

यावेळी माजी नगरसेवक जावेदभाई जुनेजा, दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष भाई सय्यद फुरकान अहमद, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष भाई अदनान पारेख, जिल्हा सरचिटणीस अदनान कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology