ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Thursday, August 27, 2026 1:33 pm

पालकमंत्री पदाच्या संधीचे नक्कीच सोने करणार, पालकमंत्री भरतशेठ गोगावले


मुंबई प्रतिनिधी
आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो.

रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेने मला प्रेम दिले, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. आज महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे.

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन.

आजपर्यंत महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील जनतेने आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या शिवसैनिकांनी मला जी साथ दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आता हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जायचे आहे.

माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे.

पदाबरोबर जबाबदारी येते आणि जबाबदारीसोबत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळते. आज रायगडच्या विकासाची ही संधी मला मिळाली आहे. या संधीचे नक्कीच सोन करेन.अशी माहिती अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री आणि नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology