ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, August 29, 2026 1:42 am

गोकुळधाममध्ये पीपीपी तत्वावर दिलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत चालते शाळा, महापालिकेची केली फसवणूक

केतन खेडेकर

गोकुळधाम येथील प्रसुतीगृहाची जागा पीपीपी तत्त्वावर नवजात शिशु कक्षासह बाल रुग्णालय सुरू करण्याकरिता देण्यात आल्यानंतर भाडेकराराचे उल्लंघन करून तिथे शाळा सुरू करण्यात आली आहे.  मोठ्या संघर्षानंतर ही आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला असला तरी संबंधित संस्था या जागेचा वापर माता व बाल रूग्णाच्या आरोग्य सेवेसाठी न करता त्याठिकाणी शाळा चालवत आहे. त्यामुळे महापालिका कराराचे उल्लंघन करणाऱ्या मेसर्स लाइफ  लाईन संस्थेचा करार संपुष्टात आणला जावा, आणि त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने माता व बाल रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सौ. प्रिती मनोज सातम यांनी महापालिका सभागृहात हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली आहे



दरम्यान, महापालिका सभागृहामध्ये महापौर रितू तावडे यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेत मेसर्स लाईफ लाईन संस्थेची चौकशी करून पुढील कारवाईचा अहवाल आपल्याला सादर करण्यात यावा असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

गोरेगावमधील प्रभाग क्रमांक ५२मधील गोकुळधाम प्रसुतीगृहाच्या जागेचा संबंधित संस्थेकडून दुरुपयोग होत असून ज्या हेतूसाठी ही जागा मेसर्स लाईफलाईन संस्थेला दिली आहे, त्यासाठी याचा वापर होत नाही. उलट तिथे शाळा चालवली जात असल्याचा हरकतीचा मुद्द्याद्वारे स्थानिक नगरसेविका सौ. प्रिती मनोज सातम ह्यांनी महापालिका सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. या हरकतीच्या मुद्दयाद्वारे सौ. सातम यांनी गोकुळधाम प्रसुतीगृहाची जागा आरक्षण समायोजन अंतर्गत प्राप्त झाल्यानंतर तिथे समाजकंटकांचा अड्डा बनला होता. परंतु ही जागा प्रसुतीगृहासाठी राखीव होती. महापालिका आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नसल्याने सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी मोठा लढा उभारुन महापालिकेला याठिकाणी माता व बाल रुग्णांना सेवा मिळावी याकरता अद्ययावर नवजात शिशू कक्षासह माता व बाल रुग्णालय सुरु करण्याची मागणी करत पाठपुरावा केला,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर याठिकाणी सन २०१८मध्ये पीपीपी तत्वावर खासगी संस्थेची नेमणूक करून त्यांच्या मार्फत नवजात शिशू कक्षासह माता व बाल रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरीने मेसर्स लाईफ लाईन संस्थेला येथील तीन मजली इमारत  १५ वर्षांच्या भाडेकरारावर हस्तांतरीत करण्यात आली.

परंतु, याठिकाणी चार महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही संबंधित संस्थेने ही सेवा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे गोरेगाव टोपीवाला रुग्णालयातील एका नवजात शिशूला एनआयसीयूची गरज निर्माण झाल्यानंतर गोकुळधाम येथील प्रसुतीगृहाच्या पीपीपी तत्वारील दिलेल्या जागेत ही सेवा उपलब्ध न झाल्याने भांडुप येथील प्रसुतीगृहात हलवण्यात आले. पण ते बाळ दगावले गेले. ते बाळ गोरेगावमधील होते आणि याठिकाणी ही सुविधा नसल्याने भांडुपमध्ये दाखल करण्यात झालेला विलंब यामुळे ते बाळ दगावले होते.जर ही आरोग्य सेवा याठिकाणी उपलब्ध असती तर ते गोरेगावमधील बाळ वाचले असते. पण  त्यानंतरही महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही, तर उलट या संस्थेला पाठिशी घालण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. पण त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत २०२२ पर्यंत आवाज उठवूनही कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर प्रशासक काळातही याठिकाणी कोणतीही सुधारणा झाली नाही. तर आजपावेतो याठिकाणी अद्ययावत नवजात शिशू कक्षासह माता व बाल रुग्णालय सुरु झालेले नाही, तर तिथे शाळा सुरु झाल्याची छायाचित्रांसह पुरावे दाखवत सातम यांनी या संस्थेच्या कारभाराचा पर्दाफाश केला. कागदपत्रांसह एकेक बाबी सभागृहाच्या पटलावर मांडत सातम यांनी गोकुळधाम, आरे कॉलनी,संतोष नगर, अप्पा पाडा येथील गरीब कुटुंबातील महिलांना आणि त्यांच्या बाळांना आपण वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून ही वास्तू चालवण्यास दिली होती. पण तिथे सन २०१८ पासून काय चालले आहे हे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही? कुणाचा एवढा वरदहस्त आहे असा सवाल करत सातम यांनी या संस्थेला त्वरीत टर्मिनेट करण्यात यावे तसेच याठिकाणी आसपासच्या परिसरातील गरीब कुटुंबातील माता व बालकांवरील उपचार प्राप्त व्हावेत यासाठी महापालिकेच्यावतीने अद्ययावत नवजात शिशू कक्षासह माता व बाल रुग्णालय सुरु करावे तसेच तळ मजल्यावर हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी सभागृहात भावनिक मांडलेल्या मुदद्यामध्ये स्तंब्धता पसरली होती.

यावेळी महापौर रितू तावडे यांनी प्रिती सातम यांनी मांडलेला मुददा गंभीर असून सन २०१८पासून माता व बाल रुग्णांना उपचार मिळावे यासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ही वास्तू ज्या मेसर्स लाईफ लाईन या संस्थेला देण्यात आली आहे, त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आणि या कारवाईचा अहवाल मला वेळोवेळी देण्यात यावा असे सांगत सातम यांचा हरकतीचा मुद्दा हा राखून ठेवत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology