ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, June 13, 2026 11:32 am

मराठी माणसांना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ न्याय देणारच<br>माजी खासदार गजानन कीर्तिकर<br>मुंबई प्रतिनिधी


मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देणारच असे जाहीर प्रतिपादन काही लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष,  माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी
एन.पी.सी.आय.एल. (NPCIL) स्थानीय लोकाधिकार सेना स्थापना सोहळा  नुकताच महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शिवसेनेमुळे आज मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला शिवसेनेमुळे मनाचे स्थान मिळाले आहे. शिवसेना नेहमीच कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही उभी राहील.
गजा भाऊ हे आम्हाला वटवृक्षाप्रमाणे असून त्यांचा कामगार क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. त्यांनी एवढी वर्ष कामगार क्षेत्रात कामगारांसाठी व्यतित केले असून त्याचा उपयोग नक्कीच आम्हाला आमच्या या एन पी सी आय एल कंपनीसाठी होईल. या कंपनीमध्ये अनेक कामगार कंत्राटी पद्धती वरती 17 – 18 वर्षे काम करत आहेत. त्यांचा परमनंट चा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी आम्ही लवकरच बैठक आयोजित करणार असून या सर्व कामगारांना आम्ही न्याय देऊ अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमात दिली. नव्याने स्थापन झालेल्या एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षपदी माजी खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ हे स्थापना झाल्यापासून अगदी जोशात काम करत आहे. स्थापनेच्या दिवशीच 28 आस्थापनामध्ये आम्ही स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून शुभारंभ केला. अनेक कामगारांचे प्रश्न आम्ही या एका वर्षातच सोडवले. त्यामुळे मोठ्या संख्येने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अनेक कंपन्या या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाकडे आकर्षित होत आहेत. कामगारांप्रती जाणीव असलेली स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही गजानन कीर्तिकर यांच्या लोक मार्गावर विश्वास ठेवून काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी या कार्यक्रमात केले. यावेळी एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार  तुकाराम काते, शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप नाईक, उपाध्यक्ष संतोष बामणे, चिटणीस करन ठाकूर, शिवसेना वैद्यकीय पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जितेंद्र सकपाळ यांच्यासह स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology