ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Saturday, June 6, 2026 4:20 am

मुंबई वि‌द्यापिठाच्या रजिस्ट्रारकडून वि‌द्यार्थ्याला धक्काबुक्की, लेखी अहवाल देण्यास विद्यापीठाचा नकार



मुंबई प्रतिनिधी
मुंबई वि‌द्यापीठातील विधी विभागाच्या एल एल एम सेमीस्टर 4 परीक्षेतील गैरप्रकाराब‌द्दल जाब विचारणाऱ्या विधी विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रार कडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याविषयी अॅड शशिकांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन विधी विभागातील गैरप्रकार उघड केला.

अॅड. शशिकांत जगताप हे मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागातील एल एल एम च्या सेमीस्टर 4 चे विद्यार्थी आहेत. डिसेंब 2025 मध्ये विधी विभागाकडून एल एल एम सेमिस्टर 4 ची अंतिम परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा डिझर्टेशन, इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट आणि तोंडी परीक्षा स्वरुपात असते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डिझर्टेशन, इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट सादर करणे आवश्यक असते. तोंडी परीक्षेच्या वेळी शशिकांत जगताप यांना फक्त त्यांचे नाव विचारले. त्यांना डिझर्टेशन, इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट बाबत कोणत्याही प्रश्न विचारले नाही. यावेळी परीक्षक नायर मॅडम यांनी शशिकांत जगताप यांना शुभेच्छा देत जाण्यास सांगितले यावेळी शशिकांत जगताप यांनी माझ्याकडून काही चूक झाली आहे का असे विचारले असता नायर मॅडम यांनी डिसिप्लिनरी प्रोजेक्टचे स्पायरल बायडिंग केले असल्याचे कारण पुढे केले आणि काहीही बोलण्यास नकार दिला, असे अॅड. शशिकांत जगताप यांनी सांगितले.

एल एल एम सेमीस्टर 4 परीक्षेचा यावर्षी जानेवारीमध्ये निकाल लागला तेव्हा शशिकांत जगताप यांना नापास करण्यात आले होते. सरकारी नोकरीत असलेल्या आणि कधीही लेक्चरमध्ये गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांनी डिझर्टेशन आणि इंटर डिसिप्लिनरी प्रोजेक्ट विधी विभागाला सादर केले नाहीत, किंवा तोंडी परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते, असा आरोप अॅड. शशिकांत जगताप यांनी केला.
प्राध्यापक अलका पाटील यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या सोयीनुसार लेक्चर घेतले होते. विद्यार्थ्यांना लेक्चर बाबत निरोप दिला जायचा. प्राचार्य अलका पाटील यांनी याबाबत एकदा विचारणा केली होती तेव्हापासून त्यांचा माझ्यावर राग होता आणि हा राग त्यांनी मला अंतिम परीक्षेत नापास करून काढला अशी माहिती एडवोकेट शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology