मुंबई प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट येथे प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलीस पथकाने तात्काळ व प्रभावीपणे करून आग्रीपाडा, परिसरात सापळा रचून राहत्या घरामध्ये तयार केलेली मोठी प्रयोगशाळा उध्वस्त केली. ग्राहकांना विक्री करीता बनविलेला मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी रसायने जप्त केली.यामध्ये ०३ आरोपीना अटक करण्यात आली.
मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
कांदिवली युनिट ला खबऱ्या कडून २५ मे रोजी माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने २६ मे रोजी
मुंबई मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) तयार करणारी प्रयोगशाळा उध्वस्त करण्यात आली. प्रयोगशाळेत तयार झालेले एम.डी. व लिक्वीड एम.डी. असे एकूण १४ किलो ४९३ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करुन ०३ आरोपी अटक केली.या कारवाईत एकूण पन्नास कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ व एक गावठी पिस्तुलसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
# २९,०८,२३,१००/- किमतीचे ८ किलो ३०५ ग्रॅम लिक्वीड एम.डी. व इतर साहित्य
# २१,६५,८०,०००/-
६ किलो १८८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ
एकुण हस्तगत १४ किलो ४९३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम. डी) हा
# ५०,७४,०३,१००/-
अंमली पदार्थ व त्याकरीता लागणारी रसायने कच्चा माल, उपकरणे व साहित्ये
# ६४,०००/-
एक देशी बनावटीचे पिस्तुल व १९ जिवंत राऊंडस,
त्यांचे विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरुन अं.प.वि. कक्ष कांदिवली युनिट गु.र.क्र. ५४/२०२६, कलम ८ (क) सह २२ (क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ सह क. ३,२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीना २६ मे रोजी अटक करण्यात आली आहे.
पोलीस उप आयुक्त, नवनाथ ढवळे अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिट येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत जगदाळे, स.पो.नि. उल्हास खोलम व पथक यांनी केली आहे.






