मुंबई प्रतिनिधी
आपल्याला आपल्या स्वतःवर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही परंतु स्वतःवर स्वतः प्रेम करायला शिकवणारा नेतृत्व म्हणजे डॉक्टर जगन्नाथराव हेगडे असे जाहीर प्रतिपादन भाजपा आमदार डॉक्टर चित्राताई वाघ यांनी डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले मी गेली 28 वर्षे डॉक्टर हेगडे यांच्या वाढदिवसाला आवर्जून येत असते. हेगडे यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे आपल्या घरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासारखे असून मी जेव्हा जेव्हा त्यांच्या वाढदिवसाला येते तेव्हा तेव्हा ते आणखीनच चलन होत चाललेले मला पाहायला मिळतं. निस्वार्थीपणे समाजात काम करणाऱ्या माणसांच्या यादीत जगन्नाथराव हेगडे यांचे नाव पहिले असेल. समाजात वावरताना त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांचे कार्य गेल्या 28 वर्षे मी माझ्या डोळ्यांनी पाहत आले आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.
डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे हे असं रसायन आहे की ते कधीही संपत नाही. डॉक्टर हेगडे यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि हे स्मितहास्याच त्यांना समाजात ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा देते. डॉक्टर हेगडे यांचा वाढदिवस सात जूनला येतो ही तारीख आम्ही नवीन वर्षाची डायरी घेतल्यावर त्यामध्ये नोंद करून ठेवतो आणि त्यांचे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो. मी देवाकडे त्यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मी उपस्थित राहावे यासाठी प्रार्थना करतो अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमात दिली. या समारंभात हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, नगरसेवक अनिल कोकीळ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, नगरसेविका सुप्रिया दळवी , विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






