ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Thursday, August 27, 2026 3:12 pm

अदानी इलेक्ट्रिसिटीने साडेचारशे कामगारांना दाखवला घरचा रस्ता.

मुंबई प्रतिनिधी – अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, – टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे घाणेरडे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप ‘अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशन’ने केला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून या अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखवण्याची तयारी
कंपनीकडून सुरू असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जात असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी आक्रमक झाले आहेत. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी आज मुंबईतील आझाद मैदान येथे कुटुंबासहित लाक्षणिक धरणे आंदोलन  केले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढची खाली करा, नोकरी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, आमचा अधिकार आमचा हक्क अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. व्यवस्थापनाने कोणालाही कामावरून काढू नये.  जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी बोरकर, सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी दिली.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology