मुंबई प्रतिनिधी – अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, – टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे घाणेरडे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप ‘अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशन’ने केला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून या अधिकाऱ्यांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखवण्याची तयारी
कंपनीकडून सुरू असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जात असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी आक्रमक झाले आहेत. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी आज मुंबईतील आझाद मैदान येथे कुटुंबासहित लाक्षणिक धरणे आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढची खाली करा, नोकरी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, आमचा अधिकार आमचा हक्क अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. व्यवस्थापनाने कोणालाही कामावरून काढू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याची माहिती असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी बोरकर, सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी दिली.





