केतन खेडेकर
सहा महिने होऊन गेले तरी अजित दादा यांना न्याय मिळत नाही यासाठी काँग्रेसचे युवक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर फुटपाथवर बसून जोरदार निदर्शने केली. या निदर्शनामध्ये त्यांनी त्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्ष भाजपा सेना महायुती सत्तेमध्ये सामील असून देखील त्यांना न्याय मिळत नाही तसेच अहवाल ही बाहेर येत नाही. म्हणजे यामध्ये काहीतरी काळा निळा आहे असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. हा सगळा गदारोळ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुरज चव्हाण हे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की तुम्ही न्याय मागायला आलात की स्टंटबाजी करायला आला आहात. हे योग्य नाही आम्ही राज्य शासनाशी अजितदादांचा घात आहे की अपघात आहे याचा अहवाल बाहेर यावा यासाठी योग्यपने शासमसोबत पाठपुरावा करत आहोत. लवकरच हा अहवाल बाहेर येईल तेव्हा सगळ सत्य जनतेसमोर येईल. आम्ही काँग्रेस कार्यालयात शांतपणे जाऊन गांधी मार्गाने पत्रकार परिषदेत विरोध केला. आम्ही कोणतीही हुल्लडबाजी केली नाही अशी माहिती चव्हाण यांनी दिली.





