मुंबई प्रतिनिधी – दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस दिनांक 2 जून रोजी आहे. त्यानिमित्त दैनिक शिवनेरच्या वतीने कॉटन ग्रीन मुंबई येथील अंधशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांना शुक्रवार दिनांक 22 मे रोजी दुपारी बारा वाजता मिष्ठान्न देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात बोलताना शिवनेरचे संपादक नरेंद्र विश्वनाथराव वाबळे म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. पुन्हा या हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये अशी त्यांची दानशूर वृत्ती आहे. रामशेठ यांना उदंड आयुरारोग्य लाभावे अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. म्हणूनच त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दैनिक शिवनेरच्या वतीने आम्ही सुग्रास भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.





