ताज्या बातम्या

Edit Template
आज तारीख-Tuesday, July 28, 2026 10:52 pm

केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांचा अनुसूचित जमातीला लाभ मिळवून द्यावा* <br>राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अंतर सिंह आर्य यांची सूचना*



मुंबई प्रतिनिधी

मुंबई महानगर कार्यक्षेत्रातील २२२ आदीवासी पाड्यांना बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने व्‍यापक स्‍वरूपात मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात. बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध कल्‍याणकारी योजना प्रभावीपणे राबवित असून केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांचा लाभ अनुसूचित जमातीला मिळवून द्यावा, अशी सूचना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अंतर सिंह आर्य यांनी केली.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. अंतर सिंह आर्य यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला शुक्रवार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी भेट दिली. अनुसूचित जमातीला लोकसंख्यानिहाय मिळणाऱ्या सेवासुविधा, आरक्षणानुसार नोकरभरती व पदोन्नती यांचा आढावा घेतला.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने केलेल्‍या सूचनांची दखल घेऊन त्‍याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे प्राप्‍त होणा-या तक्रारींची समन्‍वय अधिका-यांमार्फत दखल घेऊन सोडवणूक करण्‍यात येईल.

अनुसूचित जमातीची सामाजिक व  आर्थिक स्थिती यांबाबत केंद्र व राज्‍य शासनाकडून उपलब्‍ध होणा-या कल्‍याणकारी योजनांची अंमलबजावणी महानगरपालिकेत योग्‍यप्रकारे होत आहे की नाही याची देखरेख करण्‍याची जबाबदारी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाद्वारे होत असल्‍याचे श्री. राजीव सक्सेना यांनी बैठकीच्‍या प्रारंभी नमूद केले.

उप आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) श्री. किशोर गांधी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अनुसूचित जमातीच्‍या लोकसंख्‍येला उपलब्‍ध केल्‍या जाणा-या आरोग्‍य, वैद्यकीय, शैक्षणिक  सुविधांची माहिती दिली. तसेच, महानगरपालिका बिंदू नियमावली, श्रेणीनिहाय पदसंख्‍या, नोकरभरती आदींबाबत सविस्‍तर माहिती दिली.

या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांचे स्वीय सचिव श्री. राजीव सक्सेना, महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, उप आयुक्त ( सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधीं, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती प्राची जांभेकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) श्री. श्रीधर चौघरी यांच्‍यासह राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांचे ज्येष्ठ सल्लागार श्री. आर. के. दुबे, संशोधन अधिकारी श्री. अंकित कुमार सेन, ज्येष्ठ तपासणीस श्री.गोवर्धन मुंडे, स्वीय सहाय्यक श्री. आर. एन. शर्मा यांच्‍यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology