मुंबई प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मनातील महत्वाकांक्षी संकल्पना आणि राज्याच्या समस्त भगिनींचा लाडका भाऊ, महिला सक्षमीकरणासाठी कायम अग्रेसर असलेले संवेदनशील आणि कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने आयोजित ‘बीमा सखी’ महिला करिअर मार्गदर्शन व भरती मोहिमेला गिरगाव येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारून विमा क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमात २५ वर्ष विमा एजन्ट म्हणून यशस्वी कारकीर्द असलेल्या निलेश भोईटे आणि कमालक्षी उसपकर यांचा सत्कार करण्यात आला. रुपाली पै, रणजित गुजर आणि शोएब शेख या वरिष्ठ एल.आय.सी. अधिकाऱ्यांनी विमा व्यवसायातील उत्पन्नाच्या संधी, प्रशिक्षण प्रक्रिया आणि करिअर विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश शाह यांनी केले तर दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्धेश सांगितलं. या प्रसंगी विधानसभा संघटक प्रसाद गवाणकर, समीक्षा फोपले, पद्मजा वेदपाठक, उपविभाग प्रमुख संकेत नेवशे, शाखाप्रमुख कविता मल्हार, स्वाती राणे, कल्पना आमले उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांनी चर्चेत सहभागी होत आत्मनिर्भर होण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून अनेक महिलांना नवीन करिअरचा मार्ग आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ‘बीमा सखी’ उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.





