पुणे प्रतिनिधी : हडपसर–काळेपडळ परिसरातील विषारी दारूकांडात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात केवळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.नागरिकांचा सवाल आहे की, जर या दुर्घटनेसाठी फक्त संबंधित पोलीस अधिकारीच जबाबदार असतील, तर इतर भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या अड्ड्यांचे काय? राज्यभरात आणि शहरातील विविध भागांत अवैध धंद्यांविषयी वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असतात. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे वेळोवेळी याबाबत इशारे देत असतानाही त्याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, हडपसरपेक्षा काळेपडळ हद्दीत विषारी दारूमुळे अधिक बळी गेल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत कारवाईचा केंद्रबिंदू फक्त एका पोलीस ठाण्यापुरता किंवा काही अधिकाऱ्यांपुरता मर्यादित का ठेवला जात आहे, याबाबतही नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. अवैध दारूचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री ही साखळी स्वरूपात चालणारी यंत्रणा असून, त्यात अनेक स्तरांवरील दुर्लक्ष, संगनमत किंवा निष्क्रियता कारणीभूत असू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.नागरिकांच्या मते, विषारी दारूकांड ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून प्रशासनाच्या देखरेखीतील गंभीर अपयशाचे उदाहरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता संपूर्ण जबाबदारीची साखळी उघड करावी. तसेच राज्यातील आणि शहरातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर तातडीने व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.“दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी अशा अवैध धंद्यांना आधीच आळा घालण्यात प्रशासन का अपयशी ठरते?” हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करताना संपूर्ण यंत्रणेची भूमिका तपासून दोषींवर कठोर कारवाई झाली, तरच अशा घटना भविष्यात रोखता येतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी
नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने महाराष्ट्र सदन येथील विविध प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र सदनातील कामांमध्ये होत असलेली अनावश्यक दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामांबाबत हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी दिली. महाराष्ट्रातून दिल्ली येथे विविध शासकीय कामांसाठी, उपचारांसाठी तसेच इतर कारणांनी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. अशा नागरिकांना महाराष्ट्र सदनात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन प्राधान्याने काम करत असल्याचे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सदन हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथील सुविधा, स्वच्छता, देखभाल आणि आधुनिक सोयीसुविधा उच्च दर्जाच्या असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच बरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेले निवासाचे काम देखील जलद गतीने पूर्ण कणायसाठी सूचना दिल्या. बैठकीदरम्यान नवीन महाराष्ट्र सदन व जुने महाराष्ट्र सदन येथे सुरू असलेल्या दुरुस्ती, सुशोभीकरण, कर्मचारी निवास व्यवस्था सुधारणा, विद्युत व्यवस्था, पायाभूत सुविधा उन्नतीकरण, अंतर्गत देखभाल तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक कामे मंजूर होऊनही अद्याप पूर्णत्वास न गेल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे प्रत्यक्ष पाहणी करून कामांमध्ये गती आणावी तसेच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. कामांच्या प्रगतीबाबत समाधानकारक स्थिती दिसून न आल्याने काही संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री भोसले यांनी बैठकीतच कडक शब्दांत तंबी दिली. नागरिकांच्या सुविधांशी संबंधित कामांमध्ये विलंब होणे गंभीर बाब असून, यापुढे कामकाजात दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र सदनातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांची सद्यस्थिती, कामांची गती आणि गुणवत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शासन निर्णयानुसार नवीन महाराष्ट्र सदनाच्या मागील बाजूचे नुतनीकरण, नवीन व जुन्या महाराष्ट्र सदनातील विद्युत उपकरणांचे अद्यावतीकरण तसेच आधुनिक आयपी आधारित सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये नुतनीकरण, विद्युतीकरण, फर्निचर, एचव्हीएसी दुरुस्ती, एलईडी प्रकाशयोजना सुधारणा, विद्युत वायरिंग बदल, तसेच नवीन सीसीटीव्ही यंत्रणा स्थापनेचा समावेश आहे. कामे हाती घेताना अर्थसंकल्पीय तरतूद, तांत्रिक मान्यता, पर्यावरण विषयक नियम, ‘ना हरकत’ प्रमाणपत्रे, ई-निविदा प्रक्रिया तसेच GeM पोर्टलच्या कार्यपद्धतीचे पालन करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि प्रशासनातील समन्वय याबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येईल तसेच प्रलंबित कामांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच महाराष्ट्र सदन प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*डिजिटल क्रांतीच्या वळणावर मराठी पत्रकारितेचा नवा चेहरा: मुंबई-ठाण्यातील पत्रकारांचा विशेष नियुक्ती सोहळा*
विशेष प्रतिनिधी: आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात डिजिटल माध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, माहितीच्या तत्पर प्रसारासाठी ही माध्यमे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच डिजिटल क्रांतीचा विचार करून आणि डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद’ व ‘डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र राज्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी एका विशेष नियुक्ती सोहळ्याचे व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सायं. ४:०० ते ६:०० या वेळेत मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या मजल्यावर संपन्न होणार आहे.या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुंबई व ठाणे कमिटीच्या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. डिजिटल पत्रकारितेतील नवनवीन प्रवाह, माध्यमांची वाढती जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य या विषयांवर नवनियुक्त पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर, डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल वाघमारे, मुंबई विभागीय सचिव दीपक केतके आणि विभागीय उपाध्यक्ष विशाल परदेशी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुंबई कमिटीचे अध्यक्ष राजा आदाते, विभागीय सह-सचिव दीपक पवार, उपाध्यक्ष विनायक सानप आणि कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के विशेष परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक आणि दर्पणकार यांच्या प्रतिमेचे पूजन करून होईल. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, मुंबई व ठाणे कमिटीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप, नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन, आभार प्रदर्शन आणि शेवटी चहापानासह या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पन्नास कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त…
मुंबई प्रतिनिधी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट येथे प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलीस पथकाने तात्काळ व प्रभावीपणे करून आग्रीपाडा, परिसरात सापळा रचून राहत्या घरामध्ये तयार केलेली मोठी प्रयोगशाळा उध्वस्त केली. ग्राहकांना विक्री करीता बनविलेला मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी रसायने जप्त केली.यामध्ये ०३ आरोपीना अटक करण्यात आली. मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.कांदिवली युनिट ला खबऱ्या कडून २५ मे रोजी माहिती मिळाली. माहितीच्या अनुषंगाने २६ मे रोजी मुंबई मध्ये मेफेड्रॉन (एम.डी.) तयार करणारी प्रयोगशाळा उध्वस्त करण्यात आली. प्रयोगशाळेत तयार झालेले एम.डी. व लिक्वीड एम.डी. असे एकूण १४ किलो ४९३ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करुन ०३ आरोपी अटक केली.या कारवाईत एकूण पन्नास कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ व एक गावठी पिस्तुलसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. # २९,०८,२३,१००/- किमतीचे ८ किलो ३०५ ग्रॅम लिक्वीड एम.डी. व इतर साहित्य # २१,६५,८०,०००/- ६ किलो १८८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ एकुण हस्तगत १४ किलो ४९३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम. डी) हा # ५०,७४,०३,१००/-अंमली पदार्थ व त्याकरीता लागणारी रसायने कच्चा माल, उपकरणे व साहित्ये# ६४,०००/-एक देशी बनावटीचे पिस्तुल व १९ जिवंत राऊंडस, त्यांचे विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरुन अं.प.वि. कक्ष कांदिवली युनिट गु.र.क्र. ५४/२०२६, कलम ८ (क) सह २२ (क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ सह क. ३,२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीना २६ मे रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त, नवनाथ ढवळे अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिट येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत जगदाळे, स.पो.नि. उल्हास खोलम व पथक यांनी केली आहे.
वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद,४ महिन्यांत १५ हजार जणांना चावा
मुंबई प्रतिनिधी वसई-विरार शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात अवघ्या ४ महिन्यांत १५ हजार श्वानदंशाच्या केसेस समोर आल्या आहेत. वसई-विरार उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि कुत्र्यांनी चावा घेण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांच्या मदतीने कुत्र्यांची नसबंदी मोहीम जलद गतीने राबवणे आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र शेल्टर होम उभारणे समाविष्ट आहे. *१ लाख कुत्रे, केवळ ३० हजारांची नसबंदी* पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार जुळ्या शहरांमध्ये सध्या अंदाजे १ लाख भटके कुत्रे आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित ७० हजार कुत्र्यांमुळे शहरात त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. *भयानक आकडेवारी समोर* या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल १५ हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. नुकतेच एका ९ वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आणि रेबीज संसर्ग झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वसई-विरारमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि पालिकेच्या कारभाराविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. *वसईत ‘डॉग शेल्टर’ उभारणार* महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वाढत्या दबावानंतर महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदीचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने आता खाजगी संस्था आणि प्राणी कल्याण संघटनांची मदत घेण्याचे ठरवले आहे.
प्रभादेवी येथील पुनर्विकासात घर न मिळाल्याने रहिवाश्यांनी रस्ता रोको करून केले आंदोलन
मुंबई प्रतिनिधी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई बाबत काल प्रभादेवी येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने रस्ता रोको करून जोरदार आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू अशी माहिती येथील अन्या येथील रहिवाशांनी दिली. सुमारे ६०० रहिवासी आजही स्वतःच्या पैशाने भाड्याच्या घरात राहत असून मागील चार वर्षांपासून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व रहिवाशांनी मिळून सुमारे २० कोटी रुपये भाडे, डिपॉझिट, स्थलांतर आणि इतर खर्चांवर स्वतःच्या खिशातून खर्च केले आहेत. अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खालावले आहे. काही रहिवासी आज आपल्यातही नाहीत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागामालक आणि यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून न्यायालयीन केसेसमुळे सामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुनर्विकासाबाबत २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रत्येक रहिवाशाला ५८० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक बैठका, भेटी आणि घोषणांनंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रहिवाशांनी आपल्या व्यथा आणि चार वर्षांचा संघर्ष जनतेसमोर मांडण्यासाठी परिसरात एक साधा बॅनर लावला होता. त्या बॅनरवर कोणताही राजकीय मजकूर किंवा पक्षाचे नाव नव्हते. तरीही काही मिनिटांत पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बॅनर हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिला रहिवाशांसह सर्व भाडेकरूंनी तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रयत्न थांबवण्यात आला. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.आज या ६०० रहिवाशांचा एकच सवाल आहे की आश्वासनं अनेक मिळाली, पण न्याय आणि स्वतःचे घर नेमके कधी मिळणार. या संघर्षाला पाठिंबा दर्शवत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन घेऊन जोपर्यत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहितीरयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.
*वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद,४ महिन्यांत १५ हजार जणांना चावा
मुंबई प्रतिनिधी वसई-विरार शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात अवघ्या ४ महिन्यांत १५ हजार श्वानदंशाच्या केसेस समोर आल्या आहेत. वसई-विरार उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि कुत्र्यांनी चावा घेण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांच्या मदतीने कुत्र्यांची नसबंदी मोहीम जलद गतीने राबवणे आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र शेल्टर होम उभारणे समाविष्ट आहे. *१ लाख कुत्रे, केवळ ३० हजारांची नसबंदी* पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार जुळ्या शहरांमध्ये सध्या अंदाजे १ लाख भटके कुत्रे आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित ७० हजार कुत्र्यांमुळे शहरात त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. *भयानक आकडेवारी समोर* या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल १५ हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. नुकतेच एका ९ वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आणि रेबीज संसर्ग झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वसई-विरारमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि पालिकेच्या कारभाराविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. *वसईत ‘डॉग शेल्टर’ उभारणार* महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वाढत्या दबावानंतर महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदीचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने आता खाजगी संस्था आणि प्राणी कल्याण संघटनांची मदत घेण्याचे ठरवले आहे.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार,
आमदार प्रमोद जठार यांचे जाहीर प्रतिपादन
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठ्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुग्रास भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूसोबत फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा चांगला कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेर संस्थेच्या वतीने अंध बांधवांसाठी मिष्ठान्न जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार
आमदार प्रमोद जठार यांचे जाहीर प्रतिपादन
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठ्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुग्रास भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूसोबत फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा चांगला कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेर संस्थेच्या वतीने अंध बांधवांसाठी मिष्ठान्न जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती शिवनेर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार
आमदार प्रमोद जठार
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठे आहे जोपर्यंत आपण त्यांचे समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांचे समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूची फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंदमानमध्ये समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंचायतराज वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा एखादा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेरी संस्थेच्या वतीने अंद बांधवांसाठी निष्ठांना जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती शिवनेर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



