मुंबई प्रतिनिधीआपल्याला आपल्या स्वतःवर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही परंतु स्वतःवर स्वतः प्रेम करायला शिकवणारा नेतृत्व म्हणजे डॉक्टर जगन्नाथराव हेगडे असे जाहीर प्रतिपादन भाजपा आमदार डॉक्टर चित्राताई वाघ यांनी डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले मी गेली 28 वर्षे डॉक्टर हेगडे यांच्या वाढदिवसाला आवर्जून येत असते. हेगडे यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे आपल्या घरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासारखे असून मी जेव्हा जेव्हा त्यांच्या वाढदिवसाला येते तेव्हा तेव्हा ते आणखीनच चलन होत चाललेले मला पाहायला मिळतं. निस्वार्थीपणे समाजात काम करणाऱ्या माणसांच्या यादीत जगन्नाथराव हेगडे यांचे नाव पहिले असेल. समाजात वावरताना त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांचे कार्य गेल्या 28 वर्षे मी माझ्या डोळ्यांनी पाहत आले आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे हे असं रसायन आहे की ते कधीही संपत नाही. डॉक्टर हेगडे यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि हे स्मितहास्याच त्यांना समाजात ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा देते. डॉक्टर हेगडे यांचा वाढदिवस सात जूनला येतो ही तारीख आम्ही नवीन वर्षाची डायरी घेतल्यावर त्यामध्ये नोंद करून ठेवतो आणि त्यांचे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो. मी देवाकडे त्यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मी उपस्थित राहावे यासाठी प्रार्थना करतो अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमात दिली. या समारंभात हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, नगरसेवक अनिल कोकीळ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, नगरसेविका सुप्रिया दळवी , विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी माणसांना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ न्याय देणारच
माजी खासदार गजानन कीर्तिकर
मुंबई प्रतिनिधी
मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देणारच असे जाहीर प्रतिपादन काही लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीएन.पी.सी.आय.एल. (NPCIL) स्थानीय लोकाधिकार सेना स्थापना सोहळा नुकताच महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शिवसेनेमुळे आज मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला शिवसेनेमुळे मनाचे स्थान मिळाले आहे. शिवसेना नेहमीच कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही उभी राहील.गजा भाऊ हे आम्हाला वटवृक्षाप्रमाणे असून त्यांचा कामगार क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. त्यांनी एवढी वर्ष कामगार क्षेत्रात कामगारांसाठी व्यतित केले असून त्याचा उपयोग नक्कीच आम्हाला आमच्या या एन पी सी आय एल कंपनीसाठी होईल. या कंपनीमध्ये अनेक कामगार कंत्राटी पद्धती वरती 17 – 18 वर्षे काम करत आहेत. त्यांचा परमनंट चा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी आम्ही लवकरच बैठक आयोजित करणार असून या सर्व कामगारांना आम्ही न्याय देऊ अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमात दिली. नव्याने स्थापन झालेल्या एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षपदी माजी खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ हे स्थापना झाल्यापासून अगदी जोशात काम करत आहे. स्थापनेच्या दिवशीच 28 आस्थापनामध्ये आम्ही स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून शुभारंभ केला. अनेक कामगारांचे प्रश्न आम्ही या एका वर्षातच सोडवले. त्यामुळे मोठ्या संख्येने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अनेक कंपन्या या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाकडे आकर्षित होत आहेत. कामगारांप्रती जाणीव असलेली स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही गजानन कीर्तिकर यांच्या लोक मार्गावर विश्वास ठेवून काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी या कार्यक्रमात केले. यावेळी एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार तुकाराम काते, शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप नाईक, उपाध्यक्ष संतोष बामणे, चिटणीस करन ठाकूर, शिवसेना वैद्यकीय पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जितेंद्र सकपाळ यांच्यासह स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील पर्यावरणीय पुनर्संचयितीकरण प्रकल्प — कचरा डेपोचे सजीव जंगलात रूपांतर
मुंबई प्रतिनिधी मुंबईची पर्यावरणीय लवचिकता अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड आणि ब्राझीलस्थित लारा सेंट्रल डी ट्रॅटामेंटो डी रेसिड्युओस लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या विशेष उद्देश वाहन (SPV) अँटनी लारा एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज ‘रीरूट’ या अभिनव शहरी वननिर्मिती उपक्रमाचा शुभारंभ केला. हा उपक्रम आशियातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी असलेल्या कचरा प्रक्रिया केंद्रांपैकी एक असलेल्या कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील वरिष्ठ अधिकारी आणि आघाडीचे पर्यावरण वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रकल्पांतर्गत 15,000 स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, मुंबईच्या सुमारे 90% महानगरपालिका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या परिसराचे रूपांतर दाट आणि स्वयंभू शहरी जंगलात केले जाणार आहे. ही नवीन वृक्षलागवड सध्या परिसरात अस्तित्वात असलेल्या 12,800 वनस्पतींना पूरक ठरेल.15,000 लागवड करण्यात येणारेस्थानिक वृक्ष असून यातून ~330 टन दरवर्षी शोषले जाणारेCO₂ 9,000–12,000 टन30 वर्षांत साठवले जाणारेCO₂25 वर्षे शाश्वत कार्याचाअनुभव या कचरा प्रक्रिया केंद्रापासून सजीव परिसंस्थेकडे असणार आहे.हा प्रवास एका ओसाड खारफुटीच्या जमिनीपासून सुरू झाला. आज हे मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या कचरा व्यवस्थापन केंद्रांपैकी एक आहे. आता ते एका समृद्ध शहरी परिसंस्थेत रूपांतरित होणार आहे. पूर्ण विकसित झाल्यानंतर, हे शहरी जंगल दरवर्षी सुमारे 330 टन CO₂ शोषून घेईल आणि पुढील 30 वर्षांत अंदाजे 9,000–12,000 टन CO₂ साठवून ठेवेल. त्यामुळे मुंबईच्या शहरी परिसरात एक महत्त्वपूर्ण दीर्घकालीन कार्बन सिंक निर्माण होईल.कार्बन शोषणाव्यतिरिक्त, हा प्रकल्प परिसरातील नागरिकांना अनेक ठोस पर्यावरणीय लाभ देईल. यात स्थानिक तापमानात 2–5°C पर्यंत घट, नैसर्गिक धूळ गाळणीद्वारे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, पक्षी, फुलपाखरे आणि परागीकरण करणाऱ्या कीटकांचे पुनरागमन, तसेच उष्णता, धूळ आणि पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह कमी करणे यांचा समावेश आहे.या वनात नीम, अर्जुन, जांभूळ, वड, पिंपळ, करंज आणि बांबू यांसह सातपेक्षा अधिक स्थानिक आणि हवामान-प्रतिरोधक वृक्षप्रजातींचा समावेश असेल. या प्रजाती मिळून विविध स्तरांची वनस्पती रचना तयार करतील, ज्यामुळे जैवविविधतेला चालना मिळेल, मातीचे आरोग्य सुधारेल आणि हवामान बदलांप्रती लवचिकता वाढेल.या प्रसंगी बोलताना, श्री. शिजू अँटनी, मुख्य शाश्वतता अधिकारी, अँटनी वेस्ट ग्रुप, म्हणाले:“कचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन अनेकदा आपण काय हटवतो यावर केले जाते. हे जंगल मात्र आपण काय निर्माण करू शकतो हे दाखवते. 15,000 स्थानिक वृक्षांची लागवड करून आम्ही आमच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्याच एका भागाचे रूपांतर अशा परिसंस्थेत करत आहोत, जी पुढील अनेक दशकांपर्यंत पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिक समुदायांना लाभ देईल.”शहरी पायाभूत सुविधांच्या जबाबदाऱ्यांची नव्याने व्याख्याभारतभरातील शहरे जलद शहरीकरण आणि हवामान बदल या दुहेरी आव्हानांना सामोरे जात असताना, हा उपक्रम दाखवून देतो की अत्यावश्यक शहरी पायाभूत सुविधा पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. मुंबईमध्ये दररोज 7,000 टनांहून अधिक महानगरपालिका कचरा निर्माण होत असून हवामानाशी संबंधित दबावही वाढत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प शहरी पायाभूत सुविधांमध्ये पर्यावरणीय पुनर्संचयितीकरण समाविष्ट करण्यासाठी एक अनुकरणीय नमुना ठरतो.
साथी जॉर्ज फर्नांडिस चौक नामफलक अनावरण कार्यक्रमात सरकारचा दुजाभाव उघड
मुंबई, प्रतिनिधी मुंबई शहरात आज पर्यंत हजारो रस्ता,चौक यांना नावे देण्याची कार्यक्रम चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत संपन्न झाले आहेत. अनेक मोर्चे, आंदोलने रस्त्यावर होत असतात, फेरीवाल्यांनी मुंबईतला प्रत्येक पदपथ व रस्ता अडवलेला आहे.असे चित्र असताना काल फोर्ट मधील एका चौकाला अधिकृतरित्या समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते, कामगारांचे कैवारी, ‘बंद सम्राट’, माजी रेल्वेमंत्री, माजी संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे सहशिल्पकार जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्याच्या समारंभासाठी उभारण्यात आलेला मंच पोलिसांनी काढायला भाग पाडून जॉर्ज फर्नांडिस यांच्या देशसेवेचा अपमान केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली व पोलिसांचा निषेधही केला. पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस यांची काल जयंती होती. मुंबई महानगरपालिकेने कुलाबा येथील एका चौकास “पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस चौक” असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन ने काल बुधवारी ३ जून २०२६ रोजी जयंतीदिनी नामफलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांकडून कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेतलेली होती.असे असताना एम आर ए मार्ग पोलिसांनी तेथे उभारण्यात आलेले १५ × १० फूट व्यासपीठ ऐनवेळी काढून टाकण्याचा तगादा लावून ते हटविण्यास आयोजकास भाग पाडले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. देशाच्या राजकारणात आणि कामगार चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या, लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या आणि केंद्रीय मंत्री म्हणून देशसेवा करणाऱ्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाने आयोजित कार्यक्रमातच अशा प्रकारे अडथळे निर्माण होणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून त्यांच्या स्मृतीबाबत शासनाच्या उदासीन आणि दुजाभावाच्या भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना कामगाराढे निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने साजरा करायला पाहिजे होता पण त्यांनी तो केला नाही उलट हा आमचं कार्यक्रम नाहीं असं ते सांगत होते. असे आयोजकांनी सांगितले. देशातील अनेक नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. मात्र साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या नावाने आयोजित कार्यक्रमाला आवश्यक परवानग्या असूनही अडथळे आणले गेले हा गंभीर प्रश्न आहे. हा प्रकार त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कामगार व सामान्य नागरिकांच्या भावनांचा अवमान करणारा आहे. समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार या घटनेचा तीव्र निषेध करीत असून शासनाने याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “साथी जॉर्ज फर्नांडिस हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर संघर्ष, कामगार हक्क आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतीबाबत कोणताही दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.” असा इशारा उपस्थित समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी दिला आहे.
गिरगाव येथील बीमा सखी’ मार्गदर्शन शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मनातील महत्वाकांक्षी संकल्पना आणि राज्याच्या समस्त भगिनींचा लाडका भाऊ, महिला सक्षमीकरणासाठी कायम अग्रेसर असलेले संवेदनशील आणि कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने आयोजित ‘बीमा सखी’ महिला करिअर मार्गदर्शन व भरती मोहिमेला गिरगाव येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारून विमा क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.या कार्यक्रमात २५ वर्ष विमा एजन्ट म्हणून यशस्वी कारकीर्द असलेल्या निलेश भोईटे आणि कमालक्षी उसपकर यांचा सत्कार करण्यात आला. रुपाली पै, रणजित गुजर आणि शोएब शेख या वरिष्ठ एल.आय.सी. अधिकाऱ्यांनी विमा व्यवसायातील उत्पन्नाच्या संधी, प्रशिक्षण प्रक्रिया आणि करिअर विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश शाह यांनी केले तर दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्धेश सांगितलं. या प्रसंगी विधानसभा संघटक प्रसाद गवाणकर, समीक्षा फोपले, पद्मजा वेदपाठक, उपविभाग प्रमुख संकेत नेवशे, शाखाप्रमुख कविता मल्हार, स्वाती राणे, कल्पना आमले उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी चर्चेत सहभागी होत आत्मनिर्भर होण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून अनेक महिलांना नवीन करिअरचा मार्ग आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ‘बीमा सखी’ उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना 15 जून पर्यंत शैक्षणिक साहित्य मिळणे अवघड, काँग्रेस महापालिका गटनेते अशरफ आजमी यांचा आरोप
मुंबई प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या टेंडर प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत आणि अपारदर्शकता असल्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांना 15 जून पर्यंत शैक्षणिक सामान मिळणे फार अवघड होणार असल्याने त्यांना त्यांच्या शैक्षणिक हक्कापासून महापालिकाच वंचित ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनी मुंबई महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन केला. ते पुढे म्हणाले सध्या ही प्रक्रिया ज्या पद्धतीने चालू आहे, त्यातून पारदर्शकता, निष्पक्षता आणि आर्थिक जबाबदारी यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे दिसते की काही ठराविक लोकांना किंवा कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून निर्णय घेतले जात आहेत, ज्यामुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.सत्ताधारी पक्षाने पूर्वी दावा केला होता की जुनी खरेदी प्रक्रिया पारदर्शक नव्हती. त्यामुळे यापुढे सर्व खरेदी GeM (Government e-Marketplace) पोर्टलमार्फत केली जाईल, ज्यामुळे दलाल संपतील, उत्पादकांना थेट संधी मिळेल आणि महानगरपालिकेला कमी दरात वस्तू मिळतील.परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. छत्री आणि रेनकोटच्या टेंडरमध्ये जास्त दर, कठोर अटी आणि पारदर्शकतेबाबत उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करण्यात आले. माझ्या माहितीप्रमाणे छत्रीचे टेंडर फक्त एका पात्र बोलीदाराला जाणुनबुजून देण्यात आले आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण होतो.त्याचप्रमाणे नोटबुकच्या टेंडरमध्ये एका कंपनीला फक्त EMD (जामीन रक्कम) ऑनलाइन भरण्याऐवजी डिमांड ड्राफ्टद्वारे भरल्यामुळे त्यांना मुद्दामून अपात्र ठरवण्यात आले. तर दुसरीकडे, आवश्यक पात्रता आणि आर्थिक क्षमता नसल्याचे सांगितल्या जाणाऱ्या दुसऱ्या कंपनीला सर्वात कमी बोलीदार घोषित करून करार देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे नियम सर्वांसाठी समानपणे लागू व्हायला पाहिजे परंतु तसे होत नाही.सत्ताधारी पक्षाने जाहीर केले होते की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे १५ जून २०२६ पूर्वी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व शैक्षणिक २७ वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील.मात्र आजपर्यंत फक्त छत्री आणि रेनकोटचे टेंडर मंजूर झाले आहेत. इतर वस्तूंची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. याचा फटका महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे शाळकरी मुलांच्या कल्याणासाठी होणारी खरेदी ही राजकीय नियंत्रण, जवळच्या लोकांना फायदा किंवा काही व्यावसायिक हितसंबंध साधण्यासाठी वापरली जाऊ नये अशी आमची मागणी आहे.सध्याची परिस्थिती पाहता टेंडर प्रक्रियेत फेरफार झाल्याचा संशय निर्माण होतो. यामुळे स्पर्धा कमी होऊ शकते, वस्तू महाग दराने खरेदी केल्या जाऊ शकतात आणि महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे आम्ही सर्व शालेय खरेदी टेंडरची सखोल चौकशी करावी.तसेच एकाच पात्र बोलीदाराला करार का देण्यात आला याची तपासणी करावी.निवडलेल्या कंपन्या सर्व पात्रता निकष पूर्ण करतात का हे पडताळावे.तांत्रिक तपासणीदरम्यान काही कंपन्यांना अपात्र ठरवण्यामागील कारणांची चौकशी करावी.दरनिर्धारण, टेंडर मूल्यांकन आणि करार मंजुरी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी.स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील सर्व दिलेल्या मंजुरी थांबवाव्यात.नियमांचा गैरवापर, पक्षपात किंवा अधिकारांचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. या सर्व मागण्या आम्ही महापालिका आयुक्तांकडे केले असल्याची माहिती काँग्रेसचे महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
प्रभादेवी येथील पुरुषोत्तम वाडीचा पुनर्विकास रखडल्याने रहिवाशांनी केले आंदोलन, महिलांवर आली मंगळसूत्र विकण्याची वेळ
मुंबई प्रतिनिधी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई बाबत काल प्रभादेवी येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने रस्ता रोको करून जोरदार आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू अशी माहिती येथील अन्या येथील रहिवाशांनी दिली. सुमारे ६०० रहिवासी आजही स्वतःच्या पैशाने भाड्याच्या घरात राहत असून मागील चार वर्षांपासून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व रहिवाशांनी मिळून सुमारे २० कोटी रुपये भाडे, डिपॉझिट, स्थलांतर आणि इतर खर्चांवर स्वतःच्या खिशातून खर्च केले आहेत. काही महिलांनी आपले मंगळसूत्र विकून आपल्या संसार चालवला.अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खालावले आहे. काही रहिवासी आज आपल्यातही नाहीत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागामालक आणि यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून न्यायालयीन केसेसमुळे सामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुनर्विकासाबाबत २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रत्येक रहिवाशाला ५८० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक बैठका, भेटी आणि घोषणांनंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आज या ६०० रहिवाशांचा एकच सवाल आहे की आश्वासनं अनेक मिळाली, पण न्याय आणि स्वतःचे घर नेमके कधी मिळणार. दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या बालेकिल्ला असून शिवसैनिकालाच कोण वाली उरला नाही असा आरोप येथील मराठी रहिवाशांनी केला.या संघर्षाला पाठिंबा दर्शवत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन घेऊन जोपर्यत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहितीरयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.
प्रभादेवी येथील पुरुषोत्तम वाडीचा पुनर्विकास रखडल्याने रहिवाशांनी केले आंदोलन, महिलांवर आली मंगळसूत्र विकण्याची वेळ
मुंबई प्रतिनिधी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई बाबत काल प्रभादेवी येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने रस्ता रोको करून जोरदार आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू अशी माहिती येथील अन्या येथील रहिवाशांनी दिली. सुमारे ६०० रहिवासी आजही स्वतःच्या पैशाने भाड्याच्या घरात राहत असून मागील चार वर्षांपासून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व रहिवाशांनी मिळून सुमारे २० कोटी रुपये भाडे, डिपॉझिट, स्थलांतर आणि इतर खर्चांवर स्वतःच्या खिशातून खर्च केले आहेत. काही महिलांनी आपले मंगळसूत्र विकून आपल्या संसार चालवला.अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खालावले आहे. काही रहिवासी आज आपल्यातही नाहीत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागामालक आणि यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून न्यायालयीन केसेसमुळे सामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुनर्विकासाबाबत २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रत्येक रहिवाशाला ५८० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक बैठका, भेटी आणि घोषणांनंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आज या ६०० रहिवाशांचा एकच सवाल आहे की आश्वासनं अनेक मिळाली, पण न्याय आणि स्वतःचे घर नेमके कधी मिळणार. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नगरसेविका विशाखा राऊत,आमदार महेश सावंत, खासदार अनिल देसाई हे आम्हाला काहीच मदत करत नाही. दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या बालेकानंद शिवसैनिकालाच कोण वाली उरला नाही असा आरोप येथील मराठी रहिवाशांनी केला.या संघर्षाला पाठिंबा दर्शवत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन घेऊन जोपर्यत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहितीरयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.
एडीएम आणि टेक्नोसर्व यांच्यात झाला करार
मुंबई प्रतिनिधी — एडीएम (न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज : एडीएम ) या नैसर्गिक स्रोतांवर आधारित नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये जागतिक अग्रणी असलेल्या कंपनीने आज जाहीर केले की, भारतातील महाराष्ट्र राज्यातील १५,००० नव्या सोयाबीन शेतकऱ्यांमध्ये पुनरुत्पादक शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था टेक्नोसर्व्ह सोबत नव्या भागीदारीअंतर्गत ५ लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा उपक्रम कंपनीच्या “फार्म फॉरवर्ड” मोहिमेचा एक भाग आहे.कंपनीच्या सामाजिक गुंतवणूक विभाग असलेल्या “एडीएम केअर्स”च्या निधीतून राबविण्यात येणारा हा १८ महिन्यांचा स्थानिक उपक्रम महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत कार्यान्वित केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जमिनीची सुपीकता व मृदास्वास्थ्य सुधारणा, शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) सक्षम करणे, तसेच डिजिटल मार्गदर्शन साधने आणि शासकीय योजनांपर्यंत शेतकऱ्यांचा अधिक व्यापक प्रवेश वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.या भागीदारीला सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करून औपचारिक मान्यता देण्यात आली असून, मे २०२६ पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या अंतर्गत एडीएमकडून धोरणात्मक दिशा, प्रशासन व देखरेख पुरविण्यात येईल, तर टेक्नोसर्व्ह प्रत्यक्ष क्षेत्रीय अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळणार आहे.शाश्वत शेतीच्या प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमांतर्गत रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी करणे आणि पुनरुत्पादक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यावरणीय फायद्यांपलीकडे जाऊन, सहभागी शेतकऱ्यांच्या उपजीविकेत दीर्घकालीन सुधारणा घडवून आणणे हा देखील या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. अधिक सातत्यपूर्ण उत्पादन आणि खर्चातील कार्यक्षमता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. शाश्वत शेती पद्धतींमुळे प्रत्यक्ष आर्थिक प्रगती साध्य होऊ शकते, असा मार्ग हा उपक्रम निर्माण करीत असून, त्यामुळे प्रदेशातील कृषी पुरवठा साखळी अधिक सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह बनण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमाची सुरुवात जमिनीची सुपीकता आणि पाण्याची स्थिती यांचे सविस्तर मूल्यमापन करण्याच्या प्रारंभिक टप्प्यापासून होणार आहे. यासाठी शासनाच्या विद्यमान तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांचा वापर केला जाणार आहे. या अभ्यासाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार सुसंगत कृषी मार्गदर्शन दिले जाईल, ज्यामुळे अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. या पायाभूत कार्यानंतर दोन पीक हंगामांदरम्यान कार्यक्रमातील गावांमध्ये सुमारे २०० प्रात्यक्षिक प्लॉट उभारले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना मृदास्वास्थ्य सुधारणा, जलसंधारण आणि दीर्घकालीन उत्पादकता वाढविणाऱ्या शेती पद्धती प्रत्यक्ष पाहता आणि स्वीकारता येतील. कार्यक्रमाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी सुमारे आठ शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करण्यात येणार असून, त्या ग्रामीण कृषी विकासाच्या केंद्रांप्रमाणे कार्य करतील.या कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल कृषी उपाययोजनांचे शासनाच्या विविध योजनांशी एकत्रीकरण करण्यालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या “महा-अॅग्री टेक” प्रकल्पाचाही समावेश आहे. अचूक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे. उपग्रह आधारित माहिती आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, कीड प्रादुर्भाव आणि शेतातील परिस्थितीविषयी माहिती आधारित मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे शेतपातळीवर अधिक वेळेवर आणि योग्य निर्णय घेणे शक्य होणार आहे. तसेच खते आणि पीक संरक्षण उत्पादनांचा अधिक अचूक व कार्यक्षम वापर करण्यास मदत मिळेल. यासोबतच “महाविस्तार” अॅपसारख्या सल्लागार व्यासपीठांशी शेतकऱ्यांना जोडले जाईल, ज्याद्वारे त्यांना तात्काळ आणि वैयक्तिक कृषी मार्गदर्शन उपलब्ध होईल.या भागीदारीविषयी बोलताना अमरेंद्र मिश्रा म्हणाले, “एडीएममध्ये आम्ही मानतो की शाश्वत पुरवठा साखळीची सुरुवात सक्षम आणि तग धरणाऱ्या शेतकरी समुदायांपासून होते. टेक्नोसर्व्ह सोबतच्या भागीदारीतून आम्ही जागतिक ‘फार्म फॉरवर्ड’ उपक्रमांतर्गत २०२६ साठी एडीएमचा एपीएसी प्रमुख कार्यक्रम राबवत आहोत. आमचे कौशल्य, भागीदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या एकत्रित बळावर हवामान बदलासमोरील शेतकऱ्यांची क्षमता वाढविणे, मृदास्वास्थ्य सुधारणे आणि लक्षित प्रशिक्षण व तंत्रज्ञान आधारित उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आमचा उद्देश आहे.”टेक्नोसर्व्ह (TechnoServe) इंडियाचे कंट्री डायरेक्टर जॉयदीप दत्त म्हणाले: “आमचा असा ठाम विश्वास आहे की, कृषी क्षेत्रात शाश्वत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या अन्न-प्रणालीचा कणा असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होणे अनिवार्य आहे. ADM सोबतच्या भागीदारीतून, आम्ही आमचे क्षेत्रीय कसब आणि समुदायाशी असलेले दृढ संबंध यांच्या जोडीने महाराष्ट्रातील अल्पभूधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम बनवत आहोत. याद्वारे हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता (climate resilience) निर्माण करणे आणि पुनरुत्पादक शेतीचा अवलंब करणे, यावर आमचा भर आहे. शेतकऱ्यांची उपजीविका अधिक समृद्ध करून माणूस आणि निसर्ग या दोन्ही घटकांसाठी हितकारक ठरेल अशी कृषी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”या भागीदारीच्या माध्यमातून एडीएम आणि टेक्नोसर्व्ह भारतात पुनरुत्पादक शेतीला चालना देण्यासाठी विस्तारक्षम आदर्श मॉडेल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत. मूल्यसाखळीतील विविध घटकांमधील सहकार्यामुळे शेतपातळीवर अर्थपूर्ण प्रगती साधता येते, हवामान बदलासमोरील क्षमता अधिक मजबूत होते आणि शाश्वत उपजीविकेला पाठबळ मिळते, हे या उपक्रमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.एडीएम विषयीएडीएम नैसर्गिक साधनसंपत्तीची शक्ती उलगडून जीवनमान अधिक समृद्ध करण्यासाठी कार्यरत आहे. कंपनी जागतिक कृषी पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया करणारी एक महत्त्वाची संस्था असून, स्थानिक गरजा आणि जागतिक क्षमता यांना जोडून अन्नसुरक्षेला बळकटी देते. मानव आणि पशुपोषण क्षेत्रातील अग्रगण्य पुरवठादार म्हणून एडीएमकडे नैसर्गिक स्रोतांवर आधारित घटक आणि उपाययोजनांचा उद्योगातील सर्वांत व्यापक संच उपलब्ध आहे.आरोग्य आणि कल्याण क्षेत्रातही कंपनी आघाडीवर असून, अधिक निरोगी जीवनशैली स्वीकारू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी विविध नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करून देते. जैवआधारित ग्राहक आणि औद्योगिक उपाययोजनांच्या भविष्यास दिशा देणारी अत्याधुनिक नवोन्मेषक कंपनी म्हणूनही एडीएमची ओळख आहे. तसेच सक्षम कृषी क्षेत्र, लवचिक पुरवठा साखळी आणि वाढत्या जैवअर्थव्यवस्थेला पाठबळ देणाऱ्या व्यवसाय आधारित शाश्वत उपक्रमांमध्येही कंपनी अग्रस्थानी आहे. जगभरात एडीएमचे कौशल्य आणि नवोन्मेष पीक कापणीपासून ग्राहकांच्या घरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करीत आहेत.अधिक माहितीसाठी: www.adm.comटेक्नोसर्व्हविषयीटेक्नोसर्व्हविषयी: टेक्नोसर्व्ह ही एक जागतिक स्वयंसेवी संस्था असून मागील ५० हून अधिक वर्षांपासून लघुधारक शेतकरी व उद्योजकांना ज्ञान, भांडवल आणि बाजारपेठीय संधींशी जोडून शाश्वत समृद्धी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे कार्य पुनरुत्पादक व समावेशक विकास तत्त्वांवर आधारित असून, त्याद्वारे शाश्वत उत्पन्नवाढ, परिसंस्था पुनर्संचयितीकरण आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास प्रोत्साहन दिले जाते.सध्या संस्था ३० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून भारतात गेल्या १५ वर्षांपासून विविध विकासाभिमुख उपक्रम राबवत आहे. भारतामध्ये टेक्नोसर्व्ह कृषी मूल्यसाखळी परिवर्तन, शाश्वत व जबाबदार स्त्रोत व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय विकास, पुनरुत्पादक शेती तसेच महिला आर्थिक सक्षमीकरण या क्षेत्रांतील व्यापक कार्यक्रमांची अंमलबजावणी करते. या उपक्रमांद्वारे ८०,००० हून अधिक लघुधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोच साधली गेली आहे.यासोबतच, हरित उद्योजकता वृद्धिंगत करण्यासाठी संस्था दक्षिण आशियातील मोठ्या प्रवेगक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम चालवत असून, ३५० पेक्षा अधिक लघु व वाढीक्षम उद्योगांना तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय विकास आणि शाश्वत वाढीसाठी सहाय्य प्रदान करत आहे.
जनसामान्यांच्या सुखाचा ‘भरत’ मार्ग: मंत्री भरतशेठ गोगावले
योगेश भुतडा, मुंबई महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा आणि दांडग्या जनसंपर्काचा वेगळा ठसा उमटवणारे नेते म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले. रायगडच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत वाढलेल्या या नेत्याने आपल्या आक्रमक, पण तितक्याच प्रेमळ स्वभावाने प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा घेतलेला हा धावता आढावा.तळागाळातील नेतृत्वाची घोडदौडभरतशेठ गोगावले यांचा राजकीय प्रवास कोणत्याही मोठ्या राजकीय वारशाशिवाय सुरू झाला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी केवळ स्वतःच्या कष्टाने आणि जनसेवेच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून ते समाजकारणाचे साधन आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. महाड, पोलादपूर आणि माणगाव परिसरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.महाडचा विकासपुरुषआमदार म्हणून काम करताना भरतशेठ यांनी मतदारसंघाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलून टाकला.मूलभूत सुविधा: ग्रामीण भागातील रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा योजना सक्षम केल्या.आपत्ती व्यवस्थापन: महाडमध्ये आलेल्या महापूर किंवा दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये त्यांनी स्वतः जमिनीवर उतरून मदतकार्य केले. पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि त्यांना तातडीची मदत मिळवून देण्यात ते नेहमी आघाडीवर राहिले.औद्योगिक व पर्यटन विकास: स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि किल्ले रायगडासह परिसरातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने निधी मंजूर करून घेतला.करारी बाणा आणि निष्ठाभरतशेठ गोगावले यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत करारी आणि स्पष्टवक्ते आहे. “जे मनात तेच ओठात” या त्यांच्या स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. कठीण राजकीय परिस्थितीतही त्यांनी घेतलेले निर्णय आणि दाखवलेली निष्ठा ही त्यांच्या राजकीय परिपक्वतेची साक्ष देते. सध्याच्या राजकीय पटलावर मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणून काम करताना त्यांनी आपली प्रशासकीय आणि राजकीय पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.शब्दाला जागणारा माणूस’भरतशेठ’ म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व. सामान्य जनतेचा कोणताही प्रश्न असो, तो सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे विरोधकही त्यांचा आदर करतात. “आम्ही नादच करत नाही, आणि केला तर थेट करतो,” हा त्यांचा गाजलेला संवाद त्यांच्या धाडसी आणि रोखठोक वृत्तीचे दर्शन घडवतो.अशा या लोकप्रीय, धडाडीच्या आणि जनतेच्या हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना.



